‘महाबीज’कडून शेतकऱ्यांना धक्का; बियाण्यांच्या किंमतीत मोठी वाढ

महाबीजने सोयाबीनसह इतरही बियाण्यांचे दर निश्चित केले आहेत
Agriculture news in Marathi, mahabeej seeds Rate Hike, Mahabeej Seeds soybean Latest rate in akola
Agriculture news in Marathi, mahabeej seeds Rate Hike, Mahabeej Seeds soybean Latest rate in akola Saam Tv

अकोला : महागाईची झळ सर्वसामान्यांबरोबर आता शेतकऱ्यांनाही (Farmer) बसू लागली आहे. औषधे, किटकनाशके तसेच रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यातच आता शासनाच्या महाबीज (Mahabeej) कंपनीने देखील बियाण्यांच्या दरात वाढ करून शेतकऱ्यांना मोठा धक्का दिला आहे. महाबीजने सोयाबीन (Soybean) बियाणे दरात प्रतिकिलो 130 ते 145 रुपयांपर्यत वाढ केली आहे. (Mahabeej Seeds Latest Rates)

Agriculture news in Marathi, mahabeej seeds Rate Hike, Mahabeej Seeds soybean Latest rate in akola
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ; पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? पाहा आजचे दर

महाबीज अर्थातच महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ दरवर्षी खरीप हंगामासाठी बियाण्यांचा सर्वाधिक पुरवठा करीत असते. महाबीजकडून बियाणे खरेदी करण्यास शेतकरी उत्सुक असतात. राज्यात आगामी हंगामासाठी बियाण्यांचा लवकरच पुरवठा सुरू होणार आहे. त्यादृष्टीने महाबीजने सोयाबीनसह इतरही बियाण्यांचे दर निश्चित केले आहेत. (Agriculture news in Marathi)

यावर्षी महाबीजचे सोयाबीन बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिकिलो 130 ते 145 रुपये अधिक द्यावे लागणार आहे. पेरणीच्या ऐन तोंडावरच सरकारच्या अधीन असणार्‍या महाबीज कंपनीने सोयाबीन बियाण्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या वर्षी सोयाबीन बियाण्यांची 30 किलोची बॅग 2230 रुपयांपर्यंत मिळत होती, मात्र यंदा हीच बॅग तब्बल दोन हजारांनी महाग झाली असून 3900 ते 4250 रुपयांना विकत घ्यावी लागणार आहे.

दरम्यान आधीच गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा हंगाम अत्यंत कठीण असणार आहे. त्यात वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बियाण्यांचे दर कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com