सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्याने फुकट वाटली मिर्ची

मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी त्यांनी रविवारच्या आठवडा बाजारात आणला होता. मात्र प्रतिकिलोस दोन रुपये देखील दर मिळाला नाही.
सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्याने फुकट वाटली मिर्ची
सरकारचा निषेध म्हणून शेतकऱ्याने फुकट वाटली मिर्ची Saam Tv

पुणे: पाच लाख खर्च करुन जोपसलेल्या ढोबळी मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी आणल्यानंतर प्रति किलोला दोन रुपये देखील दर न मिळाल्याने उद्विग्न झालेल्या शेतकरी पिता पुत्रांनी फुकट मिरची वाटली. उरलेली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर फेकून दिली. इंदापूर तालुक्यातील वडापूरी गावचे शेतकरी खंडू राजगुरु यांनी तीन महिन्यांपूर्वी तीन एकर क्षेत्रात ढोबळी मिरचीचे उत्पादन घेतले. त्याला पाच लाख रुपये खर्च आला.

मिरचीचा पहिला तोडा विक्रीसाठी त्यांनी रविवारच्या आठवडा बाजारात आणला होता. मात्र प्रतिकिलोस दोन रुपये देखील दर मिळाला नाही. त्यामुळे उद्विग्न झालेल्या खंडू राजगुरु व त्यांचा मुलगा नवनाथ या दोघांनी ढोबळी मिरचीने भरलेले वाहन शहरातील बाबा चौकात आणले. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मधोमध उभा करुन ये जा करणारांना ढोबळी मिरची फुकट वाटली.उरलेली मिरची रस्त्यावर फेकून दिली.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com