मराठवाड्यातील अनेक भागात दोन दिवसातील पावसाने उडवली दाणादाण

दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातल्या ५ जिल्ह्यात अतिवृष्टी आणि जोरदार पाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यातील अनेक भागात दोन दिवसातील पावसाने उडवली दाणादाण
मराठवाड्यातील अनेक भागात दोन दिवसातील पावसाने उडवली दाणादाणSaam Tv

औरंगाबाद : दोन दिवसांपूर्वी मराठवाड्यातल्या Marathwada ५ जिल्ह्यात अतिवृष्टी Heavy rain आणि जोरदार पाऊस झाल्यामुळे शेती Agriculture पिकांचे crops मोठे नुकसान झाले आहे. शिवाय शेतजमीन खरडून गेल्याने शेतकऱ्यांना farmers मोठा फटका बसला आहे. यामध्ये औरंगाबाद Aurangabad, जालना, नांदेड, बीड आणि लातूर Latur या पाच जिल्ह्यांत खरिपाच्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

विविध ठिकाणी पाच घरांची पडझड झाली आहे. ३५ जनावरे मरण पावली आहेत. विभागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी प्रशासनाला administration दिले आहेत. मराठवाड्यात मागील २ आठवडे दडी मारून असलेल्या, पावसाचे पुन्हा आगमन झाले आहे. सोमवारी दिवसभर मध्यम स्वरूपाची हजेरी लावल्यानंतर मध्यरात्रीपासून जोर वाढला आहे.

हे देखील पहा-

यामुळे बीड, नांदेड, औरंगाबाद आणि जालन्यातील काही मंडळांत ढगफुटीसदृश पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे नदी, पाझर, तलाव आणि बंधायांलगत असलेल्या शेतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी देखील विभागातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत districts पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. २ दिवसात पडलेल्या पावसामुळे अनेक गावात पूर स्थिती होती. पुरामध्ये वाहून गेल्याने ३५ जनावरे मरण पावली आहेत. यामध्ये औरंगाबादेत लहान- मोठी १९ जालन्यात २, नांदेडमध्ये १४ अशा जनावरांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील अनेक भागात दोन दिवसातील पावसाने उडवली दाणादाण
मुसळधार पावसाने शेतात पाणी; कांदा, सोयाबिनचे नुकसान

ढगफुटीसदृश पावसामुळे जालन्यातील अंबडमध्ये एका घराची पडझड झाली आहे. २ पूल वाहून गेले आहेत. नांदेडमध्ये एका घराचे अंशतः नुकसान झाले आहे. बीडमध्ये ३ घरांची पडझड झाली आहे. विभागात २ दिवसांच्या पावसात मका, सोयाबीन, कापूस या पिकांसह फळबागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासंदर्भातील प्राथमिक अंदाज विभागीय आयुक्तालयाच्या वतीने राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com