अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर 'ओल्या दुष्काळा'चे संकट!

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या कडेठाण येथील हे तवार शेतकरी जोडपं सध्या हताश आहे.
अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर 'ओल्या दुष्काळा'चे संकट!
अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर 'ओल्या दुष्काळा'चे संकट! saam tv

औरंगाबाद: याच खरीप हंगामात मराठवाड्यातला शेतकरी पिके वाळून जात असताना पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. पाऊस पडला नाही तर कोरडा दुष्काळ पडेल अशी भीती होती. मात्र गेल्या पाच दिवसांपासून तब्बल 396 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने आता मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे यंदा मराठवाड्यावर ओल्या दुष्काळाचं संकट ओढवलं आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातल्या कडेठाण येथील हे तवार शेतकरी जोडपं सध्या हताश आहे. कारण त्यांच्यावर ओल्या दुष्काळाचं संकट कोसळलंय. तीन भावाचं मोठं कुटुंब. सर्वजण शेतीत आपला उदरनिर्वाह करणारे. आज त्यांच्या शेतीत सगळीकडे पाणी थांबल्याने होत्याचं नव्हतं झालंय. कांदा चाळीतील कांदा नासुन जातोय. नव्यानं लावलेल्या कांदा पूर्णतः पाण्याखाली गेला. टोमॅटो शेतीत पाणी असल्यानं ते हळूहळू मरू लागलंय. मिरची थोड्याच दिवसात काढणीला येणार होती. आता पाण्यामुळे मुळासकट वाळून जाणार आहे.

अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर 'ओल्या दुष्काळा'चे संकट!
जालन्याला अतिवृष्टीचा फटका! सव्वा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली

ही एकट्या या कुटुंबाची अवस्था नाही तर मराठवाड्यातील हजारो शेतकऱ्यांची ही व्यथा आहे. खरिपासोबत बागायती शेतीतील मोसंबीसह अन्य बागामध्ये पाणी थांबलय. कित्येक हेक्टर जमिनी पाण्यासोबत वाहून गेलीय. शेतीचं अस्तित्वच पावसानं अनेक ठिकणी संपवून टाकलं आहे. मराठवाड्यात गेल्या पाच दिवसात ३९६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. ७ सप्टेंबर रोजी एका दिवसात मराठवाड्यातल्या १४६ मंडळात अतिवृष्टी झाल्यानं शेतीची दाणादाण उडाली आहे.

- काल एका दिवसात औरंगाबाद जिल्ह्यातील 44 मंडळात अतिवृष्टी झाली. जालनामध्ये 15, बीडमध्ये 20, लातूरमध्ये 08

- उस्मानाबादमध्ये 01, नांदेडमध्ये 21, परभणी जिल्ह्यात 26 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. एकाच दिवसात मराठवाड्यातील 38 तालुके बाधित झालेत. यात अनेकांचा जीव गेलाय.

- ४ ते ६ सप्टेंबर या काळात १२ जणांचा विविध घटनांत मृत्यू झाला होता.

- ७ सप्टेंबर रोजी एकाच दिवसात १४ जणांचा मृत्यू झाला.

सलग पाच दिवस पडलेल्या पावसामुळे मराठवाड्यात पाणीच पाणी झाले. लहान मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात ४९.६१ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे, तर परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प भरले आहेत. सध्या सिद्धेश्वर, येलदरी, मानार धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. बीडमधील माजलगाव, बिंदुसरा पुर्णपणे भरले आहेत. त्यासोबत निम्न दुधना ९४ टक्के, मांजरा ४९ टक्के, पैनगंगा ८९ टक्के, निम्न तेरणा ६३ टक्के पाणी जमा झाल्यानं आता पाऊस पडला तर सर्व धरणेही पूर्ण क्षमतेने भरतील असा अंदाज आहे.

अतिवृष्टी झाल्याने मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर 'ओल्या दुष्काळा'चे संकट!
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर! पिकांमध्ये आठ दिवसांपासून गुडघाभर पाणी

आता यातून उभा राहायचं कसं, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. एकाचवेळी इतका पाऊस कधीच झाला नव्हता अशी स्थिती आहे. एकाचवेळी इतकं नुकसान होण्याची ही पहिलीच वेळ असावी. आता याकाळात तातडीने पंचनामे करून दिलासा मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. गेल्या दहा वर्षांचा इतिहास पाहता तीन वेळा कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता यावर्षी ओल्या दुष्काळाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोडून टाकलंय.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com