अवकाळीचा फटका; झेंडूची आवक घटली, भाव वधारला
marigold

अवकाळीचा फटका; झेंडूची आवक घटली, भाव वधारला

मावळ : अवकाळी पावसामुळे राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे झेंडूच्या फुलांना अपेक्षीत असा भाव मिळत नाही अशी तक्रार विक्रेत्यांसह शेतक-यांची सुरु झाली आहे. मुख्यतः पुणे जिल्हा, सातारा, सांगली या भागातून मोठ्या प्रमाणात झेंडूची marigold फुले राज्यात जातात. देहू रोडच्या बाजारपेठेत यावर्षी फुलांची आवक कमी झाल्याने झेंडूचा भाव वधारला हाेता.

marigold
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत एनसीपीच्या पॅनेलची आघाडी

आज (गुरुवार) सकाळच्या सत्रात झेंडूचा किलोला दीडशे ते दोनशे रुपये भाव हाेता. यामुळे ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. झेंडू घेण्यास ग्राहकांनी बाजारपेठेत पाठ फिरवल्याचे चित्र हाेते. दरम्यान ग्राहक नसल्याने विक्रेते देखील हतबल झाले हाेते.

आज खंडेनवमीला कंपनी असो किंवा ऑफिस असो यामध्ये मोठ्या प्रमाणात फुलांची आरास करून पूजा केली जाते. मात्र बाजारात झेंडू फुलांची आवक कमी झाल्याने तसेच दर जास्त असल्याने ग्राहक बाजारपेठेत येत नसल्याचे विक्रेत्यांनी देखील सांगितले. दरम्यान उद्या (शुक्रवार) दसरा असल्याने झेंडूचा दर असाच राहिला तर माल अंगावर पडून राहिल अशी भिती व्यक्त केली जात आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com