
मावळ : बोगस बियाणांसंधर्भात सामने बातमी प्रकाशित केली होती. यानंतर कृषी अधिकारी आणि टीमने शेतकऱ्यांच्या (Farmer) बांधावर जाऊन पाहणी केली आहे. या पाहणीनंतर सदरचा अहवाल सोमवारी देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले. (Latest Marathi News)
मावळ तालुक्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट या आशयाची बातमी सर्व प्रथम साम न्युजने दिली. यानंतर कृषी अधिकारी आणि प्रशासन खडबडून जागे झाले. कृषी अधिकाऱ्यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बोगस भात शेतीची (Bogus Seeds) पाहणी केली. याबाबतचा अहवाल देखील सादर करण्यात येणार आहे.
मागील अनेक दिवसांपासून शेतकरी कृषी अधिकारी यांना पाहणी करण्यासाठी तसेच बोगस बियाणे विक्री केलेल्यावर कारवाई करण्याची मागणी करत होते. मात्र सर्व अधिकारी त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. मात्र साम न्युजने याबाबत बातमी दिल्यानंतर तातडीने कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करत अहवाल सोमवारपर्यंत देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना दिले आहे.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.