नाशिक, जळगावात महापुरानंतर मंत्र्यांचे केवळ दौरे; शेतकऱ्यांना मदत कधी?

अतिवृष्टीचा (Heavy Rain) मोठा फटका नाशिक (Nashik) आणि जळगाव जिल्ह्याला (Jalgoan District) बसला आहे.
नाशिक, जळगावात महापुरानंतर मंत्र्यांचे केवळ दौरे; शेतकऱ्यांना मदत कधी?
नाशिक, जळगावात महापुरानंतर मंत्र्यांचे केवळ दौरे; शेतकऱ्यांना मदत कधी?अभिजीत सोनावणे

नाशिक: अतिवृष्टीचा (Heavy Rain) मोठा फटका नाशिक (Nashik) आणि जळगाव जिल्ह्याला (Jalgoan District) बसला आहे. 2 दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या महापुरानं बाजरी, भुईमूग, सोयाबीन, कापूस, कांदा, भाजीपाला, द्राक्ष, डाळिंब अशा हजारो हेक्टरवरील शेत पिकांचं पूर्णपणे नुकसान झालं आहे. त्यामुळे आधी कोरड्या दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या बळीराजाला आता ओल्या दुष्काळानं उद्धवस्त केलं आहे. मात्र एकीकडे शेतकरी उध्वस्त झालेला असतांना मंत्र्यांचे केवळ पाहणी दौऱ्याचे सोपस्कार पार पडतायत, अनेक ठिकाणी पंचनामे धीम्या गतीनं सुरुय तर अनेक ठिकाणी अजून पंचनामे व्हायचे बाकी आहेत. त्यामुळे मंत्र्याच्या पाहणी दौऱ्यापलीकडे शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडायला तयार नाही. जिथे पंचनामेच अजून पूर्ण झालेले नाही, तिथे मदत तरी कधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित होतोय.

नाशिक, जळगावात महापुरानंतर मंत्र्यांचे केवळ दौरे; शेतकऱ्यांना मदत कधी?
11 सप्टेंबर 2021 - राशिभविष्य

जळगाव जिल्ह्यातील्या पूरग्रस्त भागाचीही परिस्थिती याहून वेगळी नाहीये. पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अब्दुल सत्तार, भाजप नेते गिरीश महाजन सर्वांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली, मात्र शेतकऱ्यांचे डोळे अद्यापही सरकारच्या मदतीकडेचं लागलेत. तर नाशिक जिल्ह्यातही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार यांनी नांदगावमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला, त्यानंतर आज पालकमंत्री छगन भुजबळही पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा करतायत. मात्र नेत्यांचे पाहणी दौरे तर होतायत, पण कोलमडून पडलेल्या बळीराजाला पुन्हा उभं राहण्यासाठी त्याच्या पदरात अद्याप काहीही पडायला तयार नाही.

नाशिक जिल्ह्यातील नुकसान ( प्राथमिक आकडेवारी )

- 152 गावातील 54 हजार 877 हेक्टर क्षेत्रावरील पिकं भुईसपाट

- एकूण 69 हजार 269 शेतकऱ्यांचं नुकसान

पिकांचं नुकसान ( प्राथमिक आकडेवारी )

मका - 16 हजार 936 हेक्टर

बाजरी - 7 हजार 673 हेक्टर

कापूस - 22 हजार हेक्टर

कांदा - 6 हजार 193 हेक्टर

कांदा रोपं - 863 हेक्टर

भाजीपाला - 344 हेक्टर

भुईमूग - 292 हेक्टर

सोयाबीन - 181 हेक्टर

ज्वारी - 25 हेक्टर

आणि अन्य काही पिकांचं नुकसान

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com