आत्महत्या करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याच्या घरी पोहचले आमदार मिटकरी

स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत केली होती आत्महत्या
आत्महत्या करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याच्या घरी पोहचले आमदार मिटकरी
आत्महत्या करणाऱ्या 'त्या' शेतकऱ्याच्या घरी पोहचले आमदार मिटकरीजयेश गावंडे

अकोला - एका शेतकऱ्याने स्वतःची व्हिडिओ क्लिप बनवत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. व्हिडिओ क्लिप मध्ये मी आत्महत्या करीत आहे असे या शेतकऱ्याने म्हटले होते. प्रवीण पोळकट असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेऊन यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तर इतरही मदत करण्याचे आश्वासन मिटकरी यांनी यावेळी दिले आहे. शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून ही आत्महत्या केली होती.

हे देखील पहा -

अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातकल्या साखरी येथील युवा शेतकरी प्रवीण पोळकट याने आपल्या शेतात विष घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्यावर बँकेचे कर्ज असल्यामुळे तसेच या शेतकऱ्याचा छोटा ट्रॅक्टर फायनान्स वाल्यांनी नेल्यामुळे शेतकऱ्यावर वर परिणाम झाला. त्यामुळे ही आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या शेतकऱ्याकडे स्वतःची तीन एकर कोरडवाहू शेती आहे. त्याच्या मागे पत्नी दोन मुली (एक ४ वर्षाची, एक २ वर्षाची) तसेच आजारी आई वडील आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com