माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमामध्ये बुलढाणा जिल्हा अग्रेसर

उमेद अभियानाच्या माध्यमातून घर तिथे "माझी पोषण परसबाग" तयार करण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे
माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमामध्ये बुलढाणा जिल्हा अग्रेसर
माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमामध्ये बुलढाणा जिल्हा अग्रेसर संजय जाधव

संजय जाधव

बुलढाणा : उमेद अभियानाच्या माध्यमातून घर तिथे "माझी पोषण परसबाग" तयार करण्याचा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. याच पृष्ठभूमीवर खामगाव तालुक्यातील संभापूर Sambhapur गावांमध्ये उमेद महिलांच्या पुढाकारातून घर तिथे पालेभाज्या परसबाग तयार केली जात आहे. My Nutrition Garden Development Campaign

या महिलांनी आतापर्यंत सेंद्रिय पालेभाज्यांचे Leafy vegetables गावात महत्व पटवून देत, ११ परसबाग तयार केल्या आहेत , तर गावातील १९० कुटुंबात हे जैविक सेंद्रिय पालेभाज्या परसबाग तयार करण्याचा त्यांचा मानस आहे. बाजारामध्ये Market उपलब्ध असलेला भाजीपाला रासायनिक खते Chemical fertilizers आणि कीटक नाशकांचा वापर करून पिकवला जातो, असा भाजीपाला शरीरासाठी घातक असतो.

हे देखील पहा-

शिवाय त्याचे भावही अव्वाच्या सव्वाचा असतात. यामुळे सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला लागवड करून, त्या माध्यमातून शरीराला पोषण Nutrition आहार मिळावा व सोबतच रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने उमेदच्या माध्यमातून माझी परसबागेची निर्मिती करण्यात येत आहे. गर्भवती महिला, स्तनदा माता, लहान मुले- मुली, वृद्ध नागरिक यांच्या सुदृढ आरोग्य करिता कमी खर्चात पालेभाज्या- फळभाज्या, औषधी वनस्पती गावागावात सहज उपलब्ध व्हावे, याकरिता उमेद अभियानाच्या माध्यमातून गावागावात महिला आता पुढाकार घेताना दिसत आहेत. My Nutrition Garden Development Campaign

माझी पोषण परसबाग विकसन मोहीम’ उपक्रमामध्ये बुलढाणा जिल्हा अग्रेसर
महाबळेश्वरमध्ये उगवणार आता निळा भात : कृषी विभागाचा नवा उपक्रम

कोरोनाच्या Corona महामारीमुळे प्रत्येक नागरिक आता आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसत आहे. यासाठी प्रामुख्याने पालेभाज्या आणि फळभाज्या यावर ग्रामीण भागासह शहरामधील नागरिकांचा देखील कल वाढताना दिसत आहे, आणि त्यातच उमेद महिला सेंद्रीय पालेभाज्या व फळभाज्याचे महत्त्व पटवून देताना, नागरिकांमध्ये या बाबतीत मोठा प्रतिसाद पाहायला मिळतोय. यासाठी संभापुर गावातील तेजस्विनी पवार, जयश्री गवारगुरु, कुसुम तायडे, राधा पवार, वैशाली पवार, मंदा गाडेकर, पूजा गाडेकर, लता तायडे, प्रभावती पवार, व सुवर्णा गवारगुरू या महिला पुढाकार घेतले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com