Yavatmal News : शेतक-यांसाठी आनंदाची बातमी; नाफेडने सुरु केली तूर खरेदी केंद्र; जाणून घ्या प्रक्रिया

शेतक-यांनी नाफेड केली हाेती केंद्र सुरु करण्याची मागणी
Nafed
Nafedsaam tv

- संजय राठाेड

Yavatmal News : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यात तूरीची (tur) लागवड दीड लाख हेक्टर पेक्षा अधिक झाली होती. परंतु नाफेड (National Agricultural Cooperative Marketing Federation of India Ltd.) कडून तूरीची खरेदी बंद हाेती. त्यामुळे शेतकरी (farmers) चिंतेत हाेते. दरम्यान नाफेडने तूर खरेदीसाठी सात केंद्र सुरु केल्याची घाेषणा नुकतीच केली आहे.

Nafed
Positive News : कांदा लसूण विक्रेत्याचा प्रामाणिकपणा, दागिन्यांसह हजाराे रुपये केले परत

यंदा तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी व्यापारी वर्ग (traders) तूरीला अपेक्षीत भाव देत नव्हता. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला हाेता. साडे सात हजार रूपयांपर्यंत भाव मिळण्याची शाश्वती शेतक-यांना हाेती. परंतु त्यांच्या अपेक्षाभंग झाला. (Maharashtra News)

नाफेडने यवतमाळ जिल्ह्यात आधारभुत किंमत खरेदी योजने अंतर्गत तुर खरेदी करावी अशा मागणी शेतक-यांची हाेती. त्यास नुकताच हिरवा कंदील देण्यात आला आहे. आता तूर खरेदीसाठी सात केंद्रांना मंजूरी मिळाली आहे.

Nafed
Tasgoan News : तासगावात द्राक्ष उत्पादकांची चाळीस लाखांची फसवणुक; व्यापा-यासह एजंटवर गुन्हा दाखल

त्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी ६ मार्च २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. ऑनलाईन नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधारकार्ड, सात बारा उतारा, पिक पेरा व बँकेचे पासबुकची सुस्पष्ट झेरॉक्स प्रत संबंधित खरेदी केंद्रावर द्यावी. तुर खरेदीकरिता ऑनलाईन नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे.

शेतक-यांनाे नोंदणी करिता ही आहेत केंद्र

महाराष्ट्र स्टेट को. ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. मार्फत ७ खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे.

महागाव तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती, महागाव.

पांढरकवडा तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती पांढरकवडा

झरी तालुक्यात बळीराजा फळे फुले भाजीपाला कृषी उत्पादन पणन व प्रक्रीया सहकारी संस्था पाटण

पुसद तालुक्यात किसान मार्केट यार्ड शेलु (बु)

आर्णी तालुक्यात शेतकरी कृषी खाजगी बाजार दत्तरामपूर

दिग्रस तालुक्यात तालुका खरेदी विक्री समिती दिग्रस

बाभुळगाव तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती बाभुळगाव या खरेदी केंद्रांचा समावेश आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com