वीज पडून तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू

वीज पडून तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
वीज पडून तीन शेतकऱ्यांचा दुर्देवी मृत्यू
lightning strikeSaam tv

नांदेड : नांदेडमध्ये मंगळवारी सायंकाळी विजांच्‍या कडकडाटास पाऊस आला. यावेळी शेतात असताना एकाच ठिकाणी उभे असताना अंगावर वीज पडून तीन शेतकऱ्यांचा (Farmer) दुर्देवी मृत्यू झाला. भोकर तालुक्यात पाळज येथील शेतात ही दुर्दैवी घटना घडली आहे. (nanded news Three farmers death in lightning strike)

lightning strike
शिंदेच्‍या गटात जळगावातील आमदार; जिल्‍ह्यातील शिवसेनेत फुट

भोकर तालुक्यात मेघगर्जनेसह पडलेल्या पावसामुळे (Rain) बळीराजाला काहींसा दिलासा मिळाला. अनेक ठिकाणी पेरणीला सुरूवात झाली आहे. मान्‍सुनचे आगमन होत असताना अनेक भागांमध्‍ये विज पडण्याचे प्रकार झाले आहेत. यात काहींचा जीव देखील गेला आहे. यामुळे पावसाचा अंदाज दिसताच (Nanded News) सुरक्षित ठिकाणी जाऊन थांबावे असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

आडोशाला होते उभे

भोकर तालुक्‍यात वीज पडून मृत्‍यू झाल्‍याची घटना घडली असून तीन शेतकरींचा मृत्‍यू झाला आहे. साईनाथ सातमवार, भोजन्ना रामनवाड आणि राजू चटलावार अशी विज पडून मृत पावलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. वीज पडून एकाच ठिकाणी तिघांचा मृत्यू झाल्याने पाळज गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com