नंदुरबारला मिरचीची आवक वाढली; दरही मिळतोय चांगला

नंदुरबारला मिरचीची आवक वाढली; दरही मिळतोय चांगला
नंदुरबारला मिरचीची आवक वाढली; दरही मिळतोय चांगला
मिरची

नंदुरबार : बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली आहे. रोज सुमारे तीन हजार क्विंटल मिरची विक्रीसाठी शेतकरी आणत आहेत. सकाळी लवकर नंबर लागावा, म्हणून शेतकरी आदल्या रात्रीच मिरची भरलेले वाहने घेऊन बाजारपेठेत दाखल होत आहेत. दरम्यान, मिरचीची आवक वाढल्याने मिरची पथार लाल गालिचाप्रमाणे वाटू लागली आहेत. (Nandurbar-news-bajar-samiti-chilli-arrivals-increased-The-better-the-rate)

मिरची
भावजायीला पाटावर बसवत नणंदांनी ओवाळले; माहेरी आल्‍यावर अनोखी भाऊबीज

नंदुरबार मिरचीचे आगार म्हणून ओळखले जाते. येथील मिरचीची ख्याती सातासमुद्रापार गेली आहे. येथे अनेक प्रकारच्या मिरचीचे भरघोस उत्पादन घेतले जाते. दरवर्षी दहा हजार एकरपेक्षा जास्त लागवड मिरचीची होते. गुजरात सीमेवरील शेतकरीही येथे मिरची विक्रीसाठी आणतात. स्थानिक मिरची उत्पादनामुळे खासगी मिरची प्रक्रिया उद्योगही मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत.

मिरची क्षेत्रात घट‍

नैसर्गिक असमतोलामुळे कमी झालेले पर्जन्यमान असो की उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारपेठेत शेतकऱ्यांचा मिरचीला मिळणारा दर यांची गोळाबेरीज जमली नाही. यामुळे मागील पाच वर्षांत शेतकऱ्यांना मिरची उत्पादनात मोठा फटका बसला आहे. त्याचा परिणाम, शेतकऱ्यांनी मिरची लागवडीत घट झाली आहे. दहा ते ५० एकर केवळ मिरचीचे उत्पादन घेणारे शेतकरी आता केवळ एक ते २० एकरवर आले आहे. मिरचीचे क्षेत्र घटून आता ऊस, केळी, पपई या नगदी पिकांकडे शेतकरी वळले आहेत. त्यामुळे कधीकाळी रोज ३० हजार क्विंटल मिरचीची आवक होणारी येथील बाजार समितीतील मिरचीची आवक ३० टक्क्यांवर आली आहे.

२६०० पर्यंत भाव

यंदा मिरचीला सुरवातीपासूनच चांगला भाव मिळत आहे. सध्या व्हीएनआर, जरेला, फापडा आदी प्रकारच्या मिरच्या बाजारपेठेत शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत. सुमारे अडीच ते तीन हजार क्विंटल मिरची बाजार समितीत विक्रीसाठी येत आहे. सध्या दोन हजार ते दोन हजार ६०० रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहेत. परराज्यातील व्यापाऱ्यांही मिरची खरेदी करीत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये मिरची खरेदीसाठी स्पर्धा सुरू झाल्याने किमान तेवढा भाव मिळत आहे, अन्यथा पाचशे ते हजार रुपये क्विंटल मिरचीचे मातीमोल दर शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी मिळाले होते. त्यात खर्चही निघाला नव्हता.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com