Farmer: शेतकऱ्यांकडून केळी ४ ते ८ रुपये किलोने खरेदी

शेतकऱ्यांकडून केळी ४ ते ८ रुपये किलोने खरेदी
Banana Farmer
Banana FarmerSaam tv

नंदुरबार : केळी उत्‍पादक शेतकऱ्यांकडून व्यापारी बागांमध्ये केळीला (Banana) अवघ्या ३ ते ४ रुपये किलो दराने मागणी केली जात आहे. या दराने माल दिल्यास खर्चही सुटत नाही, असे शेतकऱ्यांचे (Farmer) म्हणणे आहे. उत्पादन खर्च भरून काढण्यासाठी किमान १० ते १५ रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना अपेक्षित आहे. (Nandurbar Banana Farmer)

Banana Farmer
Amaravati: रुग्णालयात लागलेली आग म्हणजे कोरोना काळातील पाप; आमदार राणा यांची यशोमती ठाकुर यांच्‍यावर टीका

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातही केळीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. उसाला पर्यायी पीक म्हणून केळीकडे पाहिले जाते. उसाच्या तुलनेत केळी लागवडीचा (Banana Crop) खर्च अधिक असला तरी उत्पन्न चांगले मिळते. मात्र गेल्या दोन वर्षांत केळी उत्पादक पुरता उद्ध्वस्त झाला आहे.

४० रूपये डझनने विक्री

केळीची खरेदी उत्पादकांकडून अवघ्या ४ ते ८ रुपये किलो दराने होत आहे. मात्र बाजारात हीच केळी ग्राहकांना ३० ते ४० रुपये डझन या दराने विक्री होत आहेत. कारण कच्ची केळी एक फणी तीन किलो भरते. केळी काढण्याची मजुरी तसेच फ्रीजरमध्ये ७ दिवस ठेवून पिकवण्याचा असा एकूण जवळपास व्यापाऱ्यांनाही 20 ते 25 रुपये खर्च येतो. त्यामुळे व्यापाऱ्यांनाही दोन पैसे मिळावे; या उद्देशाने केळीचे दर 30 ते 40 रुपये डझन असल्याचे व्यापाऱ्यांकडून बोलले जात आहे. आजपासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवात केळीचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com