कांदा पिकावर मर, होमनी, करपा रोग; शेतकरी संकटात
कांदा

कांदा पिकावर मर, होमनी, करपा रोग; शेतकरी संकटात

कांदा पिकावर मर, होमनी, करपा रोग; शेतकरी संकटात

शहादा (नंदुरबार) : कळंबूसह परिसरात कांदा पिकांवर मर, होमनी अळी, व करपा रोगाच्या प्रादुर्भावाने शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी या रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणून येत आहे. (nandurbar-news-Die-on-onion-crop-homini-karpa-disease-Farmers-in-crisis)

कधी अनियमित पाऊस कधी अति पावसामुळे डोळ्यासमोर पिकांचे होणारे अतोनात नुकसान होत आहे. अशा विविध नैसर्गिक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कांदा पिकाने लागवडीनंतर काही दिवसातच डोळ्यात अश्रू आणल्याने शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक व मानसिक संकटात दिसून येत आहे. कांदा पीक हे तीन ते चार महिन्यात निघणारे पीक आहे. मात्र योग्य भाव मिळेल याची हमी नाही. तरीही मोठ्या हिंमतीने बागायती शेतकरी दरवर्षी कांदा पीक लागवड करतात.

आतापर्यंत ४० हजार खर्च

कांदा पिकाची जुलै ते ऑगस्ट दरम्यान खरीप हंगामात लागवड केली जाते. लागवडीसाठी महागडे कांदा रोप विकत घेऊन अथवा स्वतःच्या शेतात रोप लागवड करून कांदा रोप तयार केले जाते. कळंबूसह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांदा लागवड केला आहे. लागवडीपासून ते आतापर्यंत एकरी ३५ ते ४० हजार रुपये खर्च आला असून या पुढील उत्पन्न येईपर्यंतचा खर्च यामध्ये विविध खते, फवारणी, निधणी केली जाते. मात्र सध्या या पिकावर होमनी अळी, करपा व मर (बुरशीजन्य) रोगाने थैमान घातल्याने शेतकरी वर्गामध्ये चिंता दिसून येत आहे.

कांदा
‘मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज’ वेबसाईडवरून काढली माहिती; कुटुंबावर प्राणघातक हल्ला

अति पावसामुळेच प्रादुर्भाव

महागडे खते व फवारणी करूनही या रोगाचा नायनाट होत नसल्याने कांदा पीक निम्याहुन आधिक वाया जात आहे. या रोगांमध्ये रोप खराब होणे, कांदा सडने, मूळ कुज होणे, रोप पिवळी पडणे, कांदा पात सुकने आधी लक्षणे जाणून येत आहेत. अति पावसामुळेच याचा प्रादुर्भाव होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यामुळे लागवड कांदा वाफे पूर्ण वाया जाण्याची भीती येथील शेतकऱ्यांनी व्यक केली. याची दखल घेऊन कृषी विभागाने भेट देऊन उपाययोजना सुचवावेत असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com