Agriculture News : पाऊस नसल्याने सोयाबीन, मूंग गेला वाया; शेतकऱ्यांनी फिरविला नांगर

Nandurbar News : पाऊस नसल्याने सोयाबीन मूंग गेला वाया; शेतकऱ्यांनी फिरविला नांगर
Agriculture News
Agriculture NewsSaam tv

सागर निकवाडे 
नंदूरबार
: राज्यातील कोणत्याच भागात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली आहे. त्यानुसार नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात देखील मागील २५ दिवसापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, मुंग, उडीद इतर पिकांचे उत्पादन शून्य झाले आहे. परिणामी (Farmer) शेतकऱ्यांनी पिकांवर रोटाव्हिटर फिरवून जनावरांना चारा केला आहे. दुसरीकडे अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे पपई आणि केळीच्या बागांना पाणी देता येत नाही. यामुळे बागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. (Live Marathi News)

Agriculture News
Sanjay Shirsat News : राज्यातील एका ज्येष्ठ नेत्यानं मराठा आंदोलन चिथवलं; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन, मुंग, उडीद, चवळी, तूर यासारख्या कडधान्य पिकांची लागवडी केली आहे. मात्र फुल धारणा आणि फळ धारणाच्या वेळेस पाऊस (Rain) नसल्याने पिकांचे उत्पादन येण्याची शक्यता कमीच आहे. उन्हाची तीव्रता अधिक असल्याने पीक जळत आहे. यामुळे शेतकरी आता पिकांवर रोटाव्हिटर फिरवून गुरांना चारा देण्याच्या तयारीत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी रोटाव्हेटर केले आहे. 

Agriculture News
Jalgaon News : तरुणाने पुलावरून उडी घेत संपवले जीवन

भारनियमनाचे संकट 
एकीकडे पाऊस नाही तर दुसरीकडे पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याला कारण म्हणजे महावितरणकडून केले जात असलेले अनियमित भारनियमन. पाणी देता येत नसल्याने केळी आणि पपई पिकांवरही संकट आले आहे. पाणी असूनही पिकांना पाणी देऊ शकत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप होत आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज देऊ शकत नसतील तर हे सरकार काय कामाचे असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. सरकारने शेतकरी हिताच्या गप्पा मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना दिलासादायक विद्युत पुरवठा करावा; अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com