Nandurbar News: कर्जबाजारी शेतकऱ्याने संपविले जीवन

कर्जबाजारी शेतकऱ्याने संपविले जीवन
Nandurbar News
Nandurbar NewsSaam tv

नंदुरबार : नापिकी व त्यात बँकांचा कर्जवसुलीसाठी सुरू असलेला तगादा, ते कर्ज फेडण्यासाठी गावातील काहींकडून घेतलेली तातडीची (Nandurbar News) रक्कम देण्यासाठीची चिंता आदींमुळे सैरभैर झालेल्या नगाव (भालेर) येथील शेतकरी (Farmer) संजय साहेबराव पाटील (वय ५०) यांनी कीटकनाशक घेत आत्महत्या केली. अत्यवस्थ अवस्थेत त्यांच्या मुलाने रुग्णालयात दाखल केले. मात्र ते वाचू शकले नाहीत. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (Maharashtra News)

Nandurbar News
Ratnagiri News: रेल्वे ट्रॅक ओलांडताना धडक बसल्याने युवकाचा मृत्यू

कर्जवसुलीच्या तगाद्यामुळे काही दिवसांपासून शेतकरी संजय पाटील तणावाखाली होते. त्यांची अक्राळे शिवारात शेती आहे. पत्नी, एक मुलगा व सून असा त्यांचा परिवार आहे. शेती आणि मजुरी करून ते कुटुंबाचा गाडा चालवीत होते. सद्या त्यांनी काही क्षेत्रात मका लावला आहे. मात्र खरीप हंगामात झालेल्या अत्यल्प पावसात त्यांना उत्पन्न आले नाही. त्यातच बँकेकडून पीककर्ज म्हणून ८० हजार रुपये घेतले होते. ठिबक सिंचनासाठी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र खरिपाचा खर्च वजा जाता हाती काहीच उरले नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत संजय पाटील हे काही दिवसांपासून तणावात होते.

Nandurbar News
Yavatmal Crime News: शेतातून वडील घरी आले अन्‌ मुलाचा झाला घात; अज्ञातांकडून युवकाची हत्या

बँकेकडून सुरू होता तगादा

मार्चअखेरमुळे बँकेकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी तगादा सुरू होता. त्यामुळे त्यांनी गावातील काही लोकांकडून उसनवार घेऊन ८० हजार पीककर्ज नुकतेच बँकेत भरल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. यंदा उत्पन्न आले नाही, नापिकीमुळे बँकेचे उर्वरित कर्ज कसे फेडणार, पीककर्ज फेडण्यासाठी गावातील लोकांकडून घेतलेले पैसे कसे परत करावेत? या ताणामुळे ते काही दिवसांपासून जेवणही घेत नव्हते. शुक्रवारी (ता. ३१) रात्री संजय पाटील हे अक्राळे शिवारातील शेतात मक्याला पाणी देण्यासाठी गेले होते. पहाटे चारला ते घरी आले व ओट्यावर असलेल्या खाटेवर झोपले.  हे पाहण्यासाठी मुलगा भाऊसाहेब उठला असता खाटेवर झोपलेले वडील संजय पाटील यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे त्याला दिसले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com