युरीया खतासाठी शेतकऱ्यांच्या सकाळपासूनच रांगा; जाणवतोय खताचा तुटवडा
Farmer

युरीया खतासाठी शेतकऱ्यांच्या सकाळपासूनच रांगा; जाणवतोय खताचा तुटवडा

युरीया खतासाठी शेतकऱ्यांच्या सकाळपासूनच रांगा; जाणवतोय खताचा तुटवडा

नंदुरबार : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने पेरण्या कमी झाल्या आहे. असे असले तरी युरिया खत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी सकाळी- सकाळी नवापूर शहरातील कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावल्याचे दिसून आले. (nandurbar-news-Farmers-have-been-queuing-for-urea-fertilizer)

यंदा पाऊस लांबला आहे. पाऊस लांबल्‍याने पेरणी पुर्णपणे झालेल नाही. उल्‍हाळ्यात बागायती पेरणी केलेले शेतकरी आता पाऊस पडल्‍यामुळे पिकांना खत देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांची मागणी वाढली असल्‍याने तुलनेत खतांचा तुटवडा जाणवत आहे.

मिळतोय दोनच बॅगा युरीया

सदर कृषी सेवा केंद्राकडून तीनशे रुपये प्रति बॅगप्रमाणे एका शेतकऱ्याला दोन बॅगा वाटप सुरू होते. रांगेत उभे असलेल्या शेतकऱ्यांपैकी ५० ते ६० शेतकऱ्यांनाच उपलब्ध युरिया खत मिळाले. उर्वरित शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या युरिया खताची मागणी लवकर पूर्ण करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Farmer
मुसळधार पावसाने केले उध्‍वस्‍त; नाल्‍यातील पुरात पती बेपत्ता तर बैलांचा मृत्यू; पत्नी बचावली

आतापासूनच जाणवतोय तुटवडा

दरवर्षी शासकीय कृषी शेतकी संघाच्या मार्फत शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा केला जातो. परंतु यंदा शेतकी संघांमध्ये खत उपलब्ध झाले नसल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जाते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये युरिया खताचा तुटवडा भासत असल्याने युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com