शेतकरी उत्पादक कंपनीला दिलेला राज्‍यातील पहिलाच प्रोजेक्ट; जिनिंग कंपनीची सुरुवात

शेतकरी उत्पादक कंपनीला दिलेला राज्‍यातील पहिलाच प्रोजेक्ट; जिनिंग कंपनीची सुरुवात
शेतकरी उत्पादक कंपनीला दिलेला राज्‍यातील पहिलाच प्रोजेक्ट; जिनिंग कंपनीची सुरुवात
जिनिंग कंपनी

नंदुरबार : नांदरखेडा (ता. शहादा) येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून वनश्री जिनिंग कंपनीची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकरी उत्पादक कंपनीला दिलेला महाराष्ट्रातला पहिलाच प्रोजेक्ट असून जवळपास पाच हजार शेतकरी सभासदांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून वनश्री जिनिंग कंपनीची स्थापना केली आहे. या वनश्री जिनिंग उद्घाटन सोहळा व वनश्री सूतगिरणी भूमिपूजन आज झाले. (nandurbar-news-first-project-the-state-given-to-farmer-producer-ginning-company)

वनश्री सूतगिरणी कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले असून येत्या काळात या ठिकाणी २५ हजार जात्यांची सूतगिरणी उभारली जाणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील हा पहिलाच प्रोजेक्ट असून जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नंदुरबार या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची शेती केली जाते. शेतकऱ्यांना आपला माल गुजरात किंवा मध्यप्रदेश या ठिकाणी विक्रीसाठी घेऊन जावे लागत होते. परंतु, आता शेतकरी उत्पादक कंपनीचे चेअरमन अभिजीत मोतीलाल पाटील यांच्या प्रयत्नातून पंधराशे शेतकऱ्यांच्या सभासदांद्वारे तयार झालेल्या या जिनिंग व सूतगिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापूस पिकाला चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील कंपनीला सहकार्य करण्याचे आव्हान चेअरमन अभिजित पाटील यांनी केले आहे.

जिनिंग कंपनी
शंभर क्विंटल कांद्याची चोरी; शेतातील चाळीतून केला लंपास

१५ शेतकरी सभासद

वनश्री जीनींग कंपनीमध्ये १५ शेतकरी सभासद असून साडेतीन हजार सलग्न शेतकरी सभासद आहे. एकूण पाच हजार शेतकरी सभासद आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी खासदार डॉ. हिना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, धुळ्याचे आमदार कुणाल बाबा पाटील व कंपनीचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.