Nandurbar: सोयाबीन, मक्‍याची आवक वाढली; मिळतोय उच्‍चांकी दर

सोयाबीन, मक्‍याची आवक वाढली; मिळतोय उच्‍चांकी दर
Nandurbar Bajar Samiti
Nandurbar Bajar SamitiSaam tv

नंदुरबार : नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार धान्य सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, गहू धान्याची आवक वाढली आहे. यात सोयाबीनला (Soybean) उच्‍चांकी दर मिळत आहे. (Tajya Batmya)

Nandurbar Bajar Samiti
Crime: अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस अटक

शनिवार आणि रविवार दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कृषी उत्पन्न बाजार समिती (Bajar Samiti) विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी (Farmer) वाहने घेऊन दाखल झाले होते. यामध्ये सोयाबीन, मका, ज्वारी या धान्याची आवक मोठ्या प्रमाणावर होती. सोयाबीनची आवक दोन हजार क्विंटलपर्यंत होत असून दरही 50 ते 55 रुपये प्रति किलो (Nandurbar News) अशी मिळत आहे. मका 4000 रूपये क्विंटलपेक्षा अधिक आवक होत असून दर मात्र 15 ते 16 रुपये किलो मिळत आहे.

दर आणखी वाढण्याची शक्यता

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदा सोयाबीनला उच्चांकी दर मिळत असून येत्या काही दिवसात सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीनला पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. तर मका 1500 ते 1600 दरम्यान दर मिळत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com