मशरूम पावडर कुपोषित बालकांसाठी फायदेशीर

मशरूम पावडर कुपोषित बालकांसाठी फायदेशीर
मशरूम पावडर कुपोषित बालकांसाठी फायदेशीर
मशरूम

नंदुरबार : थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे बारा महिने मशरूम शेतीला पोषक वातावरण आहे. यामुळे बेरोजगार तरुणांनी मशरूम शेतीकडे वळण्याचे आव्हान आहे. 1000 रुपये प्रति किलो दराने मशरूमची विक्री होत असून मशरूम पावडर कुपोषित बालकांसाठी फायदेशीर आहे. (nandurbar-news-Mushroom-powder-is-beneficial-for-malnourished-children)

सातपुडा दुर्गम भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी मशरूम शेती फायद्याची ठरू शकते. तरुणांनी मशरूम शेतीकडे वळावे यासाठी मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी प्रशिक्षणाचा विडा उचललेला आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ येथे बारा महिने मशरूम शेतीला पोषक वातावरण असून इथल्या तरुणांनी यात सहभागी होऊन आपला रोजगार निश्चित करावा, यासाठी यशवंत तलाव येथे एक दिवसीय मशरूम शेती कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विकेल ते पिकेल योजनेअंतर्गत मशरूम स्टॉलचे उद्घाटन माजी आमदार डॉ. नरेंद्र पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.

कुपोषित बालकांना पावडर उपयुक्‍त

महाराष्ट्रातील सर्वात जास्त कुपोषणाची संख्या असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मशरूम शेतीचे उत्पन्न घेऊन त्यावर प्रक्रिया करून बनवलेला पावडर गरोदर माता व कुपोषित बालकांना दिल्यास कुपोषणावर मात होऊ शकते. मशरूम मध्ये असलेले सत्व फायदे पाहता इतर कोणत्याही भाजीपाल्यात मिळत नाही.

मशरूम
बीएचआर घोटाळा : पुणे आर्थिक गुन्हेशाखेचे २८ बँकांवर पत्रबाण

आर्थिक सहाय्य हवे

जिल्ह्यातून रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर परराज्यात जाणाऱ्या तरुणांनी मशरूम शेतीचे धडे घेऊन आपल्या घरी हा व्यवसाय सुरू केल्यास चांगला रोजगार उपलब्ध होऊन स्थलांतर थांबवण्यास मदत होईल. जिल्हा प्रशासन, आदिवासी विकास विभाग यांनी पुढाकार घेऊन मशरूम शेतीबाबत तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी जनजागृती तसेच आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिल्यास तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. प्रशासन स्तरावर उपाययोजना करण्याची मागणी यावेळी मशरूम शेती मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांनी केली.

Related Stories

No stories found.