Nandurbar News: रावेर बाजार समितीप्रमाणे केळीला हवा दर; नंदूरबार जिल्ह्यातील उत्पादकांची मागणी

रावेर बाजार समितीप्रमाणे केळीला हवा दर; नंदूरबार जिल्ह्यातील उत्पादकांची मागणी
Nandurbar News Banana
Nandurbar News BananaSaam tv

सागर निकवाडे

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर केळीचा उत्पन्न घेतले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. मात्र जवळ असलेल्या जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर बाजार समिती केळीला १२०० ते १३०० रुपये भाव दिला जात आहे. त्‍यानुसार (Nandurbar) नंदुरबार जिल्‍ह्यातील उत्‍पादकांना देखील भाव मिळावा; अशी मागणी केली जात आहे. (Letest Marathi News)

Nandurbar News Banana
Nashik News : सातपूरच्या युवकाचा पंचवटीत खून

शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणार नसण्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. त्यामुळे एका जिल्ह्यात वेगळा भाव तर दुसऱ्या जिल्ह्यात वेगळा भाव का दिला जात आहे? त्यामुळे रावेर बाजार समिती प्रमाणे भाव मिळावे अशी अपेक्षा आता जिल्ह्यातील शेतकरी वर्ग करू लागला आहे.

नंदुरबार जिल्ह्यातून शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना सहाशे रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे रावेर बाजार समिती पेक्षा ६०० रुपयांच्या फरकाने भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना रावेर बाजार समितीप्रमाणे दर मिळावा; अशी मागणी आता जिल्ह्यातील शेतकरी वर्ग करू लागले आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com