पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतेत

पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतेत
पाऊस लांबल्यामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकरी चिंतेत
RainSaam tv

कळंबू (नंदरबार) : पावसाने यंदा हुलकावणी दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेरणी कालावधीही निघुन जात असल्याने यंदाच्या पेरण्याही यशस्वी होतील की नाही? या विवंचनेत बळीराजा आहे. शेतकरी (Farmer) आकाशाकडे डोळे लावुन पावसाची वाट पाहत आहे. (nandurbar news rains delayed sowing Farmers worried)

Rain
Ashadhi Wari: संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवेघाटातुन पंढरीच्या दिशेने

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली मात्र शहादा तालुक्यात अद्यापही एकही पाऊस (Rain) समाधानकारक झाला नाही त्यामुळे शेतकरीराजा सध्या चिंतेत आहे. त्यामुळे शेतीचे कामे देखील खोळंबली आहेत. आतापर्यन्त शेतातील नांगरणीचे ढेकळे पण तसेच आहेत. शेतात वखरणी करायची पण पाऊस न झाल्यामुळे हे शेतातील ढेकळे फुटत नाहीत. आता बळीराजा आतुरतेने पावसाची वाट पाहत आहेत.

ऊसणवारीच्‍या पैशातून खत, बि– बियाणे

पदरमोड करुन, ऊसणवारी करुन खत, बि– बियाणे शेतकऱ्यांनी आणून ठेवले आहेत. आता फक्त प्रतीक्षा फक्त पावसाची आहे. यावर्षी हवामान विभागाने वर्तवलेला अंदाज जवळपास खरा ठरत आहे. जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्याला सुरुवात केली आहे. मात्र शहादा तालुक्यातील अनेक गावामध्ये अद्यापही पेरण्या खोळंबल्या आहेत. १२ जूनच्या पहिल्या पावसानंतर परिसरात पावसाने दडी मारली आहे. पहिल्या पावसाच्या आधारे शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. मात्र लागवडीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा हावालदिल झाला.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com