कापूस, सोयाबीन घरात येण्यापूर्वीच भाव गडगडले

कापूस, सोयाबीन घरात येण्यापूर्वीच भाव गडगडले
कापूस, सोयाबीन घरात येण्यापूर्वीच भाव गडगडले
कापूस

कळंबू (नंदुरबार) : अस्मानी, सुलतानी, तुफानी अशा विविध संकटाशी सामना करणारा बळीराजा विविध नैसर्गिक संकटातून बाहेर निघत असतानाच कळंबूसह परिसरातील बळीराजाने जेमतेम पिकवलेला कापूस खाजगी जिनिंग व्यापाऱ्यांकडे कापूस खेडा खरेदीत शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे. (nandurbar-news-unbalance-rain-impact-cotton-and-soyabin-production-loss-farmer)

शहादा तालुकासह कळंबू, सारंगखेडा, अनरद, पुसनद, देऊर, टेंभा परिसरातील शेतकऱ्यांचा कापूस वेचणीस सुरुवात झाली असून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी घरात आलेला कापूस विक्री करीत आहे. कापूस खरेदी ३५०० पासून ते ४००० पर्यंत खरेदी करीत आहेत, आर्थिक विवंचनेत असणारा शेतकरी भांडवलासाठी घेतलेले उसनवारीचे पैसे परत फेडीसाठी निघालेला कापूस विक्री शिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही याचाच फायदा घेत परिसरातील जिनिंगसह खेडा व्यापारी शेतकऱ्यांची सर्रास लूट करीत असल्याचे चित्र दिसत असून या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मध्यप्रदेश राज्यातील खेतिया येथे ५००० पासून ते ६८०० रुपयापर्यंत कापसाची विक्री होत असून, व्यापारी शेतकऱ्यांकडून ओला कापूस आहे. याचे कारण दाखवत कोरडा कापसालाही कमी भावात खरेदी करीत आहेत.

सोयाबीन क्षेत्रात वाढ, मात्र दरात घसरण

शहादा तालुक्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात आले नाही तोवर दरात प्रचंड घसरण झाली आहे. काही ठिकाणी सोयाबीनला सुरुवातीला नऊ हजार ते दहा हजार असे दर मिळाले परंतु आता सध्या परिस्थिती पाहता सोयाबीनचे दर पाच हजारवर आले.

कापूस
मोदी हटाव, देश बचाव’चा नारा.. भारत बंदला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

कापसावर लाल्या, मर रोगाचा प्रादुर्भाव

पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापूस या मुख्य पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. सखल भागातील कापसावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील असंख्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचा कापूस एक ते दोनदा वेचणी होऊन शेत निकामी होईल. याबाबत शासनाने त्वरित दखल घेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्‍टरी अपेक्षित मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.