हातातोंडाशी आलेलं पिक गेलं वाहून; महिलेची विष प्राशन करुन आत्महत्या

2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्ही नाल्याचं पाणी शेतात शिरल्याने त्यांच्या 12 एकर शेतातील मका आणि कपाशीचं उभं पीक भुईसपाट झालं.
हातातोंडाशी आलेलं पिक गेलं वाहून; महिलेची विष प्राशन करुन आत्महत्या
हातातोंडाशी आलेलं पिक गेलं वाहून; महिलेची विष प्राशन करुन आत्महत्याअभिजीत सोनावणे

नाशिक: दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेत वाहून गेल्यानं खचलेल्या शेतकरी महिलेनं विषप्राशन करून आत्महत्या (Nashik Farmer Women Suicide) केल्याची दुर्दैवी घटना नांदगांवमध्ये घडली आहे . नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीमध्ये ही घटना घडली आहे. मंदाताई भाऊसाहेब काकळीज असं आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेचं नाव आहे.

2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे कोल्ही नाल्याचं पाणी शेतात शिरल्याने त्यांच्या 12 एकर शेतातील मका आणि कपाशीचं उभं पीक भुईसपाट झालं. अगदी हातातोंडाशी आलेलं सोन्यासारखं पीक एका रात्रीतून भुईसपाट झाल्यानं हताश झाल्या होत्या. याचं खचलेल्या मानसिक परिस्थितीत मंदाताई यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, असा जबाब त्यांच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

हातातोंडाशी आलेलं पिक गेलं वाहून; महिलेची विष प्राशन करुन आत्महत्या
नाशिक, जळगावात महापुरानंतर मंत्र्यांचे केवळ दौरे; शेतकऱ्यांना मदत कधी?

दरम्यान, त्यांनी विष प्राशन केल्याचं लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना न्यायडोंगरीहून उपचारासाठी नांदगावला आणतांना रस्त्यातचं त्यांचं निधन झालं. आधीच अस्मानी संकटांचा सामना, त्यात कोरोनाचं संकट आणि अतिवृष्टीनं उद्धवस्त झालेली शेती यामुळे बळीराजा किती हवालदिल झालाय, हे या घटनेवरून समोर येतंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं ठोस मदतीची गरज आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com