Nashik: चांदवड बाजारसमितीत आजपासून 3 दिवस कांदा लिलाव बंद

गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बाजारसमितीत जुन्या आणि नव्या कांदा व्यापाऱ्यांच्या वादातून संघर्ष सुरू होता. या वादातूनचं 2 दिवसांपूर्वी जुन्या कांदा व्यापाऱ्यांनी अचानक लिलावातून काढता पाय घेतल्यानं कांदा लिलाव काही काळ ठप्प झाला होता.
Chandwad Market Committee
Chandwad Market Committeeअभिजीत सोनावणे

नाशिक - जिल्ह्यातील चांदवड (Chandwad) बाजारसमितीतील कांदा लिलाव (Onion Auction) आजपासून 3 दिवसांसाठी बंद असणार आहेत. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून बाजारसमितीत जुन्या आणि नव्या कांदा (Onion) व्यापाऱ्यांच्या वादातून संघर्ष सुरू होता. या वादातूनचं 2 दिवसांपूर्वी जुन्या कांदा व्यापाऱ्यांनी अचानक लिलावातून काढता पाय घेतल्यानं कांदा लिलाव (Auction) काही काळ ठप्प झाला होता. (Onion auction closed for 3 days in Chandwad)

हे देखील पहा -

यातून मोठा गोंधळ उडाला होता. त्यामुळे चांदवड बाजारसमितीनं शेतकऱ्यांना वेठीस धरल्याप्रकरणी जुन्या कांदा व्यापाऱ्यांचे परवाने 3 दिवसांसाठी निलंबित केले असून सोमवारपासून जुन्या आणि नव्या व्यापाऱ्यांच्या एकत्रित सहभागातून कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता चांदवड बाजारसमितीतील कांदा लिलाव सोमवारपासून पूर्ववत सुरू होणार आहे. मात्र 3 दिवस कांदा लिलाव बंद असल्यानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मात्र मोठी अडचण झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com