Onion Prices : परतीच्या पावसाचा फटका; 'एपीएमसी' त 'या' कांद्याला दाेन रुपये भाव

गेल्या महिन्यापेक्षा सध्या कांद्याला कमी भाव मिळत असल्याने शेतक-यांसह व्यापारी चिंतेत पडलेत.
APMC Market , Onion
APMC Market , Onionsaam tv

- सिद्धेश म्हात्रे

APMC Market : परतीच्या पावसाचा फटका शेतक-यांसह कांदा (onion) व्यापाऱ्यांना फटका बसला आहे. ऐन दिवाळीत एपीएमसी मार्केट (APMC Market) येथे कांद्याचे दर माेठ्या प्रमाणात घसरले आहेत. यामुळे राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापा-यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी जाेर धरु लागली आहे. (APMC Market Latest Marathi News)

राज्यात सुरु असलेल्या परतीच्या पावसामुळे कांदा व्यापारी आणि शेतकरी चिंतेत सापडलेत. पावसामुळे साठवणूक केलेला कांदा सडत असून शेतकरी पाठवत असलेल्या कांद्यापैकी अर्ध्याहून जास्त कांदा ओला असल्याने या कांद्याला बाजारभाव मिळत नाही असे चित्र आहे. (Maharashtra News)

APMC Market , Onion
Diwali Holiday : शिक्षक संघटनेच्या मागणीस मिळाले यश; दिवाळी सुट्टीचे दिवस वाढले

सध्या एपीएमसी बाजारपेठेत हलक्या प्रतीच्या कांद्याला दाेन रुपये प्रति किलाे असा दर मिळत आहे. हा कांदा पाण्यात भिजल्याने त्याला कमी दर मिळत आहे. तसेच चांगल्या प्रतीच्या कांद्याला पंधरा रुपये प्रति किलाे दर मिळत आहे. यापुर्वी कांद्याला वीस ते तीस रुपये असा दर मिळत हाेता. (apmc market onion price latest marathi news)

APMC Market , Onion
Lumpy Skin Disease : काेराेनानंतर लम्पीचं संकट; कार्तिकी यात्रेतील खिलार जनावरांचा बाजार रद्द

ऐन दिवाळीत कांद्याने (onion) निचांक गाठल्याने शेतकरी (farmers) व व्यापारी हवालदिल झाले आहेत. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापाऱ्यांकडे लक्ष देण्याची मागणी एपीएमसी मार्केटमधील (apmc market) व्यापारी करीत आहेत. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com