Onion Rate : कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणले अश्रू...; दर घसरल्याने कांद्याचीच केली होळी

बाजारात कांद्याला प्रति क्विंटल अवघे ३०० ते ४०० रुपये मिळतात.
Onion Rate
Onion RateSaam TV

Onion Rate : कांद्याचे भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्यानं रडवल आहे.त्यामुळे कांद्याच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज होळीच्या दिवशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारविरोधात शिमगा केलाय.हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं कांद्यांची होळी करून शेतात कांदा पेटवून दिला. (Latest Onion Rate News)

नाशिक जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. बाजारात भाव कोसळल्याने कांद्याला लाखो रुपये खर्च करून उत्पादन खर्चही वसूल होणं मुश्किल झाल्यानं शेतातच कांदा पेटवून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारात कांद्याला प्रति क्विंटल अवघे ३०० ते ४०० रुपये मिळतात. त्यामुळे कांदा बाजारात नेण्यासाठी आणखी खर्च करण्याऐवजी येवला तालुक्यातील मातुलठाणच्या कृष्णा डोंगरे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने आज होळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या शेतातच कांद्याची होळी केली.

कांद्याला येणारा एकरी खर्च किती?

रोप टाकण्यासाठी मशागत - १,५०० रुपये

बियाणांसाठी साधारणपणे - ६ ते ८ हजार रुपये

खते आणि औषधांसाठी - ६ ते ८ हजार रुपये

लागवड आणि मजुरीचा खर्च - १३ ते १५ हजार रुपये

नांगरणी, रोटाव्हेटर, पाणी आणि अन्य खर्च - १४ हजार रुपये

औषध फवारणी - १४ हजार रुपये

निंदणीसाठी - साधारपणे ४ हजार रुपये

कांदा काढणी, साठवणूक आणि वाहतूक खर्च - १५ ते १८ हजार

Onion Rate
Yawatmal Farmer | या शेतकऱ्याने पारंपारीक शेती नाकारून घेतलं 8 लाखांच उत्पादन

कांदा लागवडीपासून तर काढणीपर्यंत अगदी पोटच्या मुलाप्रमाणे पिकाची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांवर स्वतच्या हातानेच जड अंतःकरणाने कांद्याच पीक उपटून त्याची होळी करण्याची वेळ आली आहे. बाजारात भावच नसल्याने शेतातला कांदा बाजारात नेऊन उपयोग तरी काय, त्यापेक्षा तो शेतातच जाळलेला बरा,अशी मनः स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. त्यामुळे अगदी कुटुंबातील महिला,लहान मुलं पाणावलेल्या डोळ्यांनी कांद्याला अग्निडाग दिला. या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे.

Onion Rate
ChatGPT Benefits For Farmers : ChatGPTचा फायदा आता शेतकऱ्यांनाही, अशाप्रकारे करता येणार वापर

खरं तर दरवर्षी भाव कोलमडल्याने कांद्याचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शेतकऱ्यांकडून करण्यात येतेय. कधी बाजारात पडलेले भाव तर कधी अतिवृष्टी अथवा अवकाळीने होणाऱ्या नुकसानीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कायमच संकटांचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे केंद्राच्या धरसोड धोरणामुळेही कांद्याच्या भावाची समस्या निर्माण होते. त्यामुळे हताश कांदा उत्पादक शेतकऱ्याने शेतातच कांद्याची होळी केल्यानंतर तरी मायबाप सरकार कांद्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणार का? असा प्रश्न उपस्थित होतं आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com