वाढत्या तापमानामुळे संत्राची फळगळ; संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत

मात्र यावर्षी सूर्य आग ओकतोय, 44 डिग्री तापमानामुळे आंबिया बहार गळून गेला आहे.
Orange
Orange Saam Tv

अमर घटारे

अमरावती - विदर्भाचा कैलिफोर्निया म्हणून समजल्या जाणारा अमरावतीच्या वरूड, मोर्शी, चाँदुर बाजार, धामणगाव तालुक्यातल्या संत्रा उत्पादक शेतकरी (Farmer) पुन्हा एकदा संकटात सपडलाय आहे. आंबट गोड चविसाठी या भागातील संत्रा (Orange) जगप्रसिद्ध आहे. मात्र वाढत्या तापमानामुळे संत्राचा आंबिया बहार आलाच नाही तर काही भागात गळून पडत आहे.

आरोग्याचा महामंत्र रोज खा एक संत्रा ही म्हण आता आता म्हणाच राहणार आहे. कारन विदर्भाचा कलिफोर्निया समजला जाणारा अमरावती (Amravati) जिल्यातील मोर्शी ,वरूड, चांदुर बाजार, धामणगाव,चांदूर रेल्वे भागातला संत्रा आता अडचणीत सपडला आहे.अमरावती जिल्यात जवळपास ६९ हजार हेक्टरवर संत्रा लागवड आहे. यापैकी ४० हजार हेक्टरवर आंबिया बहार आहे. मात्र यावर्षी सूर्य आग ओकतोय, 44 डिग्री तापमानामुळे आंबिया बहार गळून गेला आहे.

हे देखील पाहा -

झाडवतील 60 टक्के संत्रा गळून पडला आहे ,काही संत्रा बागेत तर आंबिया बहार आलाच नाही. त्यामुळं शेतकऱ्यां मध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाल आहे .अमरावतीच्या चांदुर रेल्वे तालुक्यातील जळका जगताप या गावात पंकज जगताप हे युवा संत्रा उत्पादक शेतकरी आहे. त्यांच्याकडे ४ एकर मध्ये संत्रा बाग आहे. ज्यात ५५० संत्रा ची झाडे आहेत. मात्र सध्या वाढत्या तापमानमूळ आंबिया बहार अपेक्षित होता मात्र आंबिया बहार आला मात्र फळगळ झाली. तेथील शेतकऱ्यांसोबत बातचीत करून परिस्थितिचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर घटारे यांनी.

संत्रा हे उन्हाळ्यातील प्रमुख पीक आहे. वाढत्या तापमानामुळे २ ते ३ टप्यात संत्राची फळगळ झाली आहे. त्यामुळे संत्रा लागवड असलेल्या १० तालुक्यात शेतीशाळेतून कृषिविभाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं जातं आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असल्याची माहिती जिल्ह्या कृषी अधीक्षकांनी दिली आहे

Orange
युवराजने शेअर केली छोट्या 'युवी'ची पहिली झलक

अमरावतीचा संत्रा उत्पादक शेतकरीं पुन्हा एकदा आर्थिक संकटात आला आहे. अशा परिस्तिथीत त्याला गरज आहे सरकरी मदतीची त्यामुळे सरकार यावर नेमका काय निर्णय घेते याकडे इथला शेतकरी लक्ष लाऊन बसला आहे. संत्राची अवस्था पाहुन लगलेला खर्चा देखील निघनारा नाही आहे अश्या परिस्थितित इथला शेतकरी आहे. गेल्या २ वर्षापासून अशाच परिस्थीतीचा सामना करत आहे. संत्राच पिक नष्ट होताना हे शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com