मावेजा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादीत जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी आंबी येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते.
मावेजा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
मावेजा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलनSaam TV

उस्मानाबाद- कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील संपादीत जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी आंबी येथील शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते, यात शेतकऱ्यांनी कॅनॉल मध्ये उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. भुम तालुक्यातील आंबी शिवारातील जवळपास 100 एक्कर जमीन 2010 मध्ये कॅनॉलसाठी अधिग्रहित करण्यात आली, मात्र याचा मावेजा या शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही. त्यामुळे गेल्या अकरा वर्षापासून शेतकरी मावेजा मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नसल्याने या शेतकऱ्यांनी जलसमाधी हे आंदोलन पुकारले होते.

यानंतरही प्रशासनाकडून त्यांच्या मागण्यांचा अनुषंगाने विचार झाला नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी काठोकाठ भरलेल्या कॅनॉल मध्ये उड्या टाकत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कॅनलवर आपत्ती व्यवस्थापनासह पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते. मात्र शेतकरी या कॅनॉलच्या बाहेर येण्यास तयार नव्हते, त्यानंतर तहसीलदार शृंगारे यांनी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्याशी फोन वरती बोलणे करून दिल्याने तीन ते चार महिन्यात तुमचा मावेजा मिळविण्यासाठी मी प्रयत्न करतो असे आश्वासन उपजिल्हाधिकारी यांनी दिले त्यामुळे काही काळ तनावा नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.