वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध रोग, किडीचा प्रादुर्भाव

तज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापन करावे
वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध रोग,किडीचा प्रादुर्भाव
वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध रोग,किडीचा प्रादुर्भावगजानन भोयर

वाशिम -  दिवसेंदिवस वातावरणात होत असलेले बदल आणि पावसाने Rain दिलेली ओढ यामुळे वाशिम Washim जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध रोग,किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी Farmer बांधवांनी वेळीच काळजी घेतली नाही तर उत्पन्नात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापन करावे असे आवाहन वाशिम कृषी संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते Bharat Gite यांनी केले आहे.

पश्चिम विदर्भात प्रामुख्याने घेण्यात येणाऱ्या सोयाबीनच्या पिकावर मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसाच्या खंडा मुळे  चक्रीभुंगा,खोडमाशी,उंटअळी,तंबाखूवरील पाने खाणारी अळी या सारख्या विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. शेतकऱ्यांनी यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळीच कीड व्यवस्थापनासह सोयाबीन पिकाला आजच्या अवस्थेत आवश्यक असणाऱ्या सूक्ष्म अन्न द्रव्याचे व्यवस्थापन करावे असे डॉ. भरत गीते यांनी सांगितले आहे.

हे देखील पहा -

कपाशी नंतर नगदी पीक म्हणून पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या सोयाबीन पिकांची वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक 3 लाख हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यानं किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे तज्ज्ञां कडून सांगण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात सोयाबीन पिकांवर विविध रोग,किडीचा प्रादुर्भाव
चिक्की घोटाळा पुन्हा चर्चेत; हायकोर्टाने विचारले प्रश्न

त्यामुळं होणारे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी वेळीच किडीचे व्यवस्थापन केले तर उत्पन्नात होणारी थांबविता येन शक्य आहे.किडीच्या प्रादुर्भाव असलेल्या पिकावर वेळीच उपाययोजना न केल्यास पिकाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होते.अशावेळी तज्ज्ञांच्या मार्गदर्शना नुसार सर्वत्र उपलब्ध असलेल्या कीटकनाशकांचा वापर करून यावर वेळीच नियंत्रण मिळविणे गरजेचे असल्याचे डॉ भरत गीते यांनी यावेळी सांगितले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com