पाणंद रस्ता चिखलमय झाल्याने खते घेऊन जाणारी बैलगाडी चिखलात फसली

कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले आहेत. खते घेऊन जात असताना एका शेतकऱ्याची बैलगाडी चिखलमय रस्त्यात फसली आहे.
पाणंद रस्ता चिखलमय झाल्याने खते घेऊन जाणारी बैलगाडी चिखलात फसली
पाणंद रस्ता चिखलमय झाल्याने खते घेऊन जाणारी बैलगाडी चिखलात फसलीजयेश गावंडे

अकोला: शेतीचा कामे चालू झाली आहेत. मात्र कमी-अधिक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले आहेत. खते घेऊन जात असताना एका शेतकऱ्याची बैलगाडी चिखलमय रस्त्यात फसली आहे. त्यामुळे शेतात जावे कसे? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. (Panand road became muddy, a bullock cart got stuck in the mud)

हे देखील पहा -

शेतकऱ्यांना कधी नैसर्गिक तर कधी मानवनिर्मित संकटांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात पीक पेरणी, शेती मशागत, शेतमाल घरी आणणे, आदींसाठी शेतात जाण्याकरिता खडीकरणाचा पाणंद रस्ता असावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र, दीर्घ कालावधीनंतरही पाणंद रस्त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने चिखलमय रस्त्यावरून शेतात जाताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणंद रस्ते चिखलमय झाले. अकोल्यातील निजामपूर ते टाकळी बू. परिसरातील शेतकऱ्यांना चिखल तुडवत शेतात जावे लागत आहे.

पाणंद रस्ता चिखलमय झाल्याने खते घेऊन जाणारी बैलगाडी चिखलात फसली
महापुरामुळे शासकीय गोदामातील खराब झालेल्या धान्याला सूटली दुर्गंधी

निजामपूर येथे शेतात बैल गाडीत खते घेऊन जाताना चिखलात बैल गाडी फसल्याने शेतकऱ्यांची मोठी पंचाईत झाली. पाणंद रस्ते चिखलमय होत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून शेतात जाण्याची वेळ आली आहे. पाणंद रस्ते चिखलमुक्त करण्यासाठी शासनाने पुरेशा प्रमाणात निधी पुरवावा, पाणंद रस्त्यांचे मजबुतीकरण व खडीकरण करण्यासाठी पुरेशा प्रमाणात निधीची तरतूद नसल्याने निजामपूर येथील शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com