परभणी: कर्जाला व नापिकीला कंटाळून पत्नीची गळा दाबून हत्या, स्वःताही केली आत्महत्या

पालम तालुक्यातील पूयणी गावात शेतकरी रंगनाथ हरिभाऊ शिंदे (वय 45) यांनी आपल्यावर झालेल्या शेतीच्या कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे.
रंगनाथ शिंदे, सविता रंगनाथ शिंदे
रंगनाथ शिंदे, सविता रंगनाथ शिंदेराजेश काटकर

राजेश काटकर

परभणी: पालम तालुक्यातील पूयणी गावात शेतकरी रंगनाथ हरिभाऊ शिंदे (वय 45) यांनी आपल्यावर झालेल्या शेतीच्या कर्जास कंटाळून आत्महत्या केली आहे. यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने शेतीच्या झालेल्या नुकसानीमुळे आपल्या डोक्यावरचा कर्जाचा बोजा उतरु शकत नाही. या काळजीने  शेतकरी रंगनाथ हरिभाऊ शिंदे यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम आपली पत्नी सविता रंगनाथ शिंदे (वय 36) हया गाढ झोपेत असताना त्याचा गळा दाबून हत्या केली आहे. (Latest Parabhani News in Marathi)

हे देखील पहा-

नंतर सुताच्या दोरीने लाकडी तुळस दोरी बांधून स्वतःची जीवन यात्रा संपवली. रंगनाथ हरिभाऊ शिंदे याना चार एकर जमीन असून दोन मुले असा परिवार आहे. यांनी याच वर्षी आपल्या स्वतःच्या शेतात बैल जोडीचे ओत केले होते. त्याच बरोबर दूध व्यवसाय म्हणून एक म्हैस घेतली होती. परंतु यावर्षी निसर्गाच्या अवकृपेने सोयाबीनचे पीक व तूर आणि मूग गेली. तसेच बँकेचे कर्ज कसे फेडावे अश्या विवंचनेत पत्नीचा गळा दाबत स्वत आत्महत्या केली. पालम पोलिसानी दोन्ही शव शवविच्छेदनास पाठवली असून डॉक्टरचा अहवाल आल्यावर पुढील तपास होणार आहे. (Latest News on parbhani)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com