खरीप हंगामाची तयारी; जिल्ह्यात चार लाख 80 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभाग सज्ज झाला आहे.
AKola News
AKola NewsSaam tv

अकोला- एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामात अकोला (Akola) जिल्ह्यातील चार लाख 80 हजार 560 हेक्टर कृषी क्षेत्रावर पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच दोन लाख 20 हजार हेक्टर वर सोयाबीनची पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. जेमतेम दिवसावर असलेल्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांसह कृषी विभाग सज्ज झाला आहे. दरम्यान आता जिल्ह्यातील शेतकरी (Farmer) पेरणी पूर्व मशागतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हे देखील पाहा -

यंदा हवामान विभागाने 99 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेत बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने बियाण्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार सोयाबीनचे 1 लाख 65 हजार क्विंटल बियाणे, तूर 2 हजार 888 क्विंटल, मूग 994 क्विंटल, उडीद 768, ज्वारी 450, मका, 38 आणि बाजरा 5 तर तिळाचे 1 क्विंटल बियाणे बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे. तर साडेतीन लाख क्विंटल घरच्या बियाण्यांचा वापर केला जाणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com