शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी
शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी SaamTVNews

शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी

नंदुरबार जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

नंदुरबार : येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जांचे बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, आदी कृषी निविष्ठा उपलब्ध करुन देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात आज खरीप हंगाम पुर्व आढावा बैठक संपन्न झाली.

हे देखील पाहा :

खरीप हंगाम 2022-2023 साठी शेतकऱ्यांना उपलब्ध करुन येणारे बियाणे चांगल्या दर्जाची असावे. राष्ट्रीय कृत बॅकांनी कृषी कर्ज वाटपाला प्राधान्य द्यावे. 127 हेक्टर क्षेत्रात एरंडी लागवड कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. रासायनिक खते विक्रेत्यांनी पीओएस मशिनद्वारेच खताची विक्री करावी. खताची विक्री शासकीय दरानेच करावी. जादा दराने विक्री बियाणे, खते तसेच कृषि निविष्ठा विक्री करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी. युरीयाचा वापर कमी होण्यासाठी नॅनो युरियाचा वापर वाढविण्यावर भर देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.

शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी
उन्हाचा अतिरेक, पाणीटंचाईने लग्नांना ब्रेक!

त्यासाठी प्रत्येक दुकानात नॅनो युरिया वापरा बाबतचे जनजागृतीपर फलक लावण्यात यावेत. ठिबक सिंचन क्षेत्र वाढवावे, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा व गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी जनजागृती करावी. वीज जोडणी पूर्ण करावी, शेतकऱ्यांच्या मागणी नुसार खताच्या बियाणे विक्रेत्यांनी उपलब्ध करुन द्यावे. सेंद्रीय खताचा कंपोस्ट, गांडुळ खत, जिवाणु खते वापरण्यासाठी जनजागृती करावी अशा सूचना पालकमंत्री के सी पाडवी यांच्या द्वारे करण्यात आल्या.

शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी
मोठी बातमी: संभाजीराजे राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढणार; 'स्वराज्य' संघटनेची घोषणा

नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगाम 2022 साठी भात, मका, ज्वारी, बाजरी, सोयाबीन व इतर बियाण्यांसाठी 23 हजार 377 क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तर बी.टी कापूस बियाण्यासाठी 6 लाख 25 हजार पाकिटांची मागणी नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी खरीप हंगामासाठी 3 हजार 30 मे. टन युरिया व 590 मे. टन डि. ए. पी. संरक्षितसाठा मंजूर केला आहे. खरीप हंगामासाठी 1 लाख 34 हजार 800 मे. टन रासायनिक खताची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक निलेश भागेश्वर यांनी दिली.

शेतकऱ्यांना बियाणे, खते उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे - पालकमंत्री पाडवी
शरद पवारांना दिलेल्या धमकीवरुन समता परिषद आक्रमक, पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या

या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रधुनाथ गांवडे, कृषी सभापती गणेश पराडके, सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, जिल्हा कृषी अधिकारी एल. डी. भोये, आदी उपस्थित होते.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.