मावळात मशागतीच्या कामांना सुरुवात; खरीप हंगामातील भात पिकाची तयारी सुरु
Saam TvSaam Tv

मावळात मशागतीच्या कामांना सुरुवात; खरीप हंगामातील भात पिकाची तयारी सुरु

यासाठी शेतीपूर्व मशागतीच्या कामांना विविध भागांत सुरुवात करण्यात आली आहे.

मावळ - हवामान खात्याकडून मिळालेल्या मान्सून आगमनाच्या वार्तानंतर मावळातील (Maval) खरीप हंगामापूर्वीच्या मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांकडून सुरुवात झाली आहे. तर काही कामे अंतिम टप्प्यात आहे. भातशेतीच्या नव्या हंगामाच्या शेतीच्या कामांना सुरुवात करून शेतकरी पुन्हा त्याच उमेदीने शेतीसाठी सज्ज झाला आहे.

हे देखील पाहा -

मावळ तालुक्यात भात हे मुख्य पीक आहे. मागील वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने भातशेतीला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले होते. मात्र हे नुकसान भरून काढण्यासाठी यंदा पुन्हा एकदा बळीराजाने कंबर कसली आहे. यासाठी शेतीपूर्व मशागतीच्या कामांना विविध भागांत सुरुवात करण्यात आली आहे.

Saam Tv
पाणीपुरवठ्यात पडणार खंड; जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

यासाठी शेतामध्ये परंपरागत 'राब' केला जात आहे. म्हणजेच शेतातील पालापाचोळा, शेण, काठ्याकुड्या त्यावर पेंडा, गवत टाकून पेटवला जात आहे. असे केल्यामुळे शेतातील अनावश्यक तण नष्ट होऊन जमीन भाजली जाते आणि यामुळे जमीन अधिक कसदार होण्यास मदत होते. भाताची पेरणी केल्यावर रोपात तण उगवून वाढू नये, हा त्याचा मुख्य हेतू असतो. आंतरमशागत अशी अनेक कामे वेळच्या वेळी होणे व योग्य पध्दतीने होणे अत्यावश्यक आहे.त्यामुळे शेतकरी आता मशागतीची कामे करण्यात व्यस्त आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com