उत्पन्नवाढीसाठी योगदान देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील चार विविध शेतकऱ्यांचा गौरव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.
उत्पन्नवाढीसाठी योगदान देणाऱ्या लातूर जिल्ह्यातील चार विविध शेतकऱ्यांचा गौरव
Latur News Saam TV

लातूर: राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये भरीव काम करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन- उत्पन्नवाढीकरीता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. २ मे रोजी नाशिक येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat singh koshyari) तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सोहळ्यात २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार देण्यात येणार आहेत. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात २ मे रोजी सकाळी ११ वाजता तीन वर्षातील १९८ पुरस्कारार्थ्यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात येणार आहे.

Latur News
राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज फैसला? मुंबई सत्र न्यायालयात आज सुनावणी

या पुरस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे तसेच अन्य मंत्री आणि मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.

कृषी पुरस्कारासाठी नागनाथ भगवंत पाटील रा. लिंबाळवाडी पो. नळेगाव ता. चाकुर जि. लातुर यांना सन 2018 -19 या वर्षांचा वसंतराव नाईक शेतीनिष्‍ठ पुरस्कार, तर रा. लातूर रोड पो. मोहनाळ ता. चाकुर जि. लातुर येथील दिनकर विठ्ठलराव पाटील यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्‍कार तर देवणी तालुक्यातील महादेववाडी येथील ओमकार माणिकराव मसकल्ले, सर्व साधारण गटातून सन 2017 चा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार लातूर तालुक्यातील मुरुड बु. येथील मुरलीधर गोविंद नागटिळक यांना देऊन गौरविण्यात येणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.