एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन..!
सांगली

एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन..!

सांगली : सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्यातील अंतराळ गावचे शेतकरी Farmer काकासाहेब सावंत यांनी एक नवीन प्रयोग केला आहे. एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. यातून ते दुष्काळी भागात उत्पादनातून लाखो रुपये कमवत आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत Jat तालुका हा दुष्काळग्रस्त भाग, याच तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती सुरू केली. नंतर शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी Nursery सुरू केली.

या दुष्काळी तालुक्यातील शेती Farming निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली. काकासाहेबांना आपल्या निर्णयाबद्दल समाधान वाटते. कारण त्यांचे कुटुंब आज नर्सरीच्या व्यवसायात चांगलेच स्थिरावले आहे.

काका साहेबांनी आयटीआयमधून डिप्लोमा केलेला आहे. तर पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशक, काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात.

त्यातून त्यांना वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. हे करत असताना सावंत यांनी 3 वर्षांच्या आंब्याच्या झाडावर एक प्रयोग केला आणि 22 प्रकारच्या आंब्याची लागवड सावंत यांनी केली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात हा प्रयोगयशस्वी केला. 

सावंतांनी त्यांची शेती आंब्याची लागवड आणि बिगर आंब्याची लागवड अशा दोन गटात विभागली आहे. केशर या आंब्याच्या जातीची लागवड जवळपास १० एकरांत करण्यात आली आहे.

तर उर्वरित १० एकरांमध्ये चिकू, डाळिंब, सीताफळ, हळद इत्यादींची लागवड केली जाते. सावंतांनी सरकारच्या विविध योजनांमधून सब्सिडीचा लाभ घेत नर्सरी सुरू केली आहे. अनेक वर्षे सातत्याने मेहनत घेत आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी हे यश मिळवले आहे.

हे देखील पहा -

जत तालुक्यात आंब्याच्या लागवडीला प्रोत्साहन दिले जाते. ऑर्डरप्रमाणे काकासाहेब आपल्या नर्सरीत केशर आंब्याची रोपे लावतात. प्रत्येक रोप ४० ते ७० रुपयांना विकले जाते. सावंत दरवर्षी जवळफास २ लाख आंब्याची रोपे विकतात.

याव्यतिरिक्त ते एक लाख सीताफळे, जांभूळ, चिकू, लिंबू इत्यांदी फळांची रोपे विकतात. सावंतांच्या नर्सरीतून रोपे घेण्यासाठी परभणी, बीड, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, विजापूर, बेळगाव इत्यादी परिसरांतून लोक येतात.

तर यावर्षी त्यांना आश्चर्यकारकरित्या ४ लाख रोपांची ऑर्डर मिळाली आहे. मेकॅनिकची छोटीशी नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्यातून मोठे यश कमावणारे काकासाहेब सावंत यांच्या यशाची कहाणी अनेकांना प्रेरणा देऊ शकते.

Edited By : Krushnarav Sathe 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com