सोयाबीन करणार मालामाल! लातुरात ६ लाख २५ हजार हेक्टर प्रस्तावित क्षेत्र

सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून दरवर्षी सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असतो.
Soybean In Latur
Soybean In Laturदीपक क्षीरसागर

दीपक क्षीरसागर

लातूर: सोयाबीन हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून दरवर्षी सोयाबीनचा सर्वाधिक पेरा असतो. गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिकचा दर मिळत आहे. त्यामुळे यंदाही सोयाबीनलाच शेतकऱ्यांची पसंती असून पेरणी क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Soybean In Latur
Breaking: भोंगे, स्पीकरबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

लातुर जिल्ह्यात ६ लाख २५ हजार प्रस्तावित क्षेत्र असून, यापैकी ४ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासाठी लागणाऱ्या बियाणाचे नियोजन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले असून बहुतांश शेतकरी घरचे बियाणे वापरत असल्याचे चित्र आहे. यंदा जवळपास २ हजार १०० हेक्टरवर उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली. त्यामधूनही मोठ्या प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले असून, खते, बियाणाचे नियोजन केले आहे.

हे देखील पहा-

जिल्हा कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. खते, बियाणे पेरणी क्षेत्राचे नियोजन झाले आहे. याबाबतचा अहवाल राज्यस्तरावरही सादर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत. खते, बियाणे, पेरणी क्षेत्राचे नियोजन झाले आहे.

याबाबतचा अहवाल राज्यस्तरावरही सादर करण्यात आला आहे. शेतकयांना मार्गदर्शन करण्यासाठी मेळावे घेतले जात आहेत. खरिपासाठी ६ लाख हेक्टर प्रस्तावित क्षेत्र असून ४ लाख ६० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित आहे. शेतकयांनी घरगुती बियाणे तयार केले आहे. खते, बियाणे, औषधी नियोजन करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानावर भर देण्यात आला आहे. असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com