रायगड जिल्ह्यात आता विविध रंगी भाताचे उत्पादन

यंदा रायगड जिल्ह्यात 210 हेक्टर क्षेत्रावर काळा, लाल व जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड केली जाणार आहे.
रायगड जिल्ह्यात आता विविध रंगी भाताचे उत्पादन
रायगड जिल्ह्यात आता विविध रंगी भाताचे उत्पादनराजेश भोस्तेकर

राजेश भोस्तेकर

रायगड - भाताचे Rice कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड Raigad जिल्ह्यात आता विविध रंगी भात लागवड केली जाणार आहे. यंदा रायगड जिल्ह्यात 210 हेक्टर क्षेत्रावर काळा, लाल व जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या Farmer उत्पादनात वाढ व्हावी यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात कॅन्सर Cancer, मधुमेह आजारावर गुणकारी असलेल्या काळ्या तांदळाची लागवड यावर्षी नाविन्यपूर्ण योजनेतून करण्यात येणार आहे.

रायगड जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 483 एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. यंदाच्या खरीप हंगामात रायगड जिल्ह्यात 1 लाख 4 हजार 31 हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्याचे तसेच उत्पादकता हेक्टरी 2993 किलो ग्राम करण्याचे नियोजन जिल्हा कृषि विभागाने केले आहे. यावर्षी परंपारिक पांढर्‍या रंगाच्या भाताबरोबरच काळा, लाल व जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड देखील केली जाणार आहे.

हे देखील पहा -

लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या या भातात प्रथिने आणि कर्बोदकांचे प्रमाण सामान्य भाताच्या तुलनेत अधिक आहे. हा भात मधुमेह आणि इतर आजारातील रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या प्रकारच्या भाताला मागणी वाढली आहे. काळ्या भाताला 400 रूपये किलो एवढा भाव मिळतो. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी देखील या भातची लागवड करावी यासाठी कृषी विभागाने प्रयत्न केले.

छत्तीसगड राज्यातून व ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथून काळ्या रंगाच्या तसेच लाल रंगाच्या भाताची बियाणे मागविण्यात आली. कर्जत येथील सगूणा बागेतून जांभळ्या रंगाच्या भाताची बियाणे मागविण्यात आली. ती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील निवडक शेतकर्‍यांना देण्यात आली आहेत. 210 हेक्टरवर त्याची लागवड केली जाणार आहे.

रायगड जिल्ह्यात आता विविध रंगी भाताचे उत्पादन
देशात कोरोनानंतर आता या विषाणूचे संकट (पहा व्हिडिओ)

ज्या शेतकर्‍यांना यंदा बियाणे उपलब्ध करून दिले आहेत. त्यांनी उत्पादीत भात पिकातून काही बियाणे इतर शेतकर्‍यांना पुढील वर्षीच्या लागवडीसाठी उपलब्ध करून द्यायचे आहे. यामुळे दरवर्षी लाल, काळ्या आणि जांभळ्या भात पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र वाढणार आहे. नैसर्गिक बदलामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होते. त्यामुळे जास्त उत्पन्न मिळवून देणार्‍या लाल, काळ्या आणि जांभळ्या रंगाच्या भाताची लागवड करण्याचा पर्याय आम्ही रायगड जिल्ह्यातील शेतकर्‍यांना उपलबध्द करून दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com