केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल- राजू शेट्टी

अस्मानी संकटात असतांना शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. यामुळे या विमा कंपनीच्या दरोड्याला कुणाचे पाठबळ आहे. मला वाटतंय केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल
केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल- राजू शेट्टी
केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल- राजू शेट्टीविनोद जिरे

बीड : शेतकरी अस्मानी संकटात असतांना शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. यामुळे या विमा कंपनीच्या दरोड्याला कुणाचे पाठबळ आहे. मला वाटतंय केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल, असा घणाघात खा. राजू शेट्टी यांनी केले आहे. तर आपल्या आईचं कुंकू पुसायला उठलेल्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पोरांनी भगतसिंग होऊन पुढे यावे, असे अवाहन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले आहे.

ते बीडच्या बनसारोळा या ठिकाणी ऊस परिषदेत बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी २ दिवसांपासून बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. ते नुकसानग्रस्त भागात जाऊन शेतकऱ्याशी संवाद साधत आहेत. यावेळी त्यांनी बनसारोळा या ठिकाणी ऊस परिषद देखील घेतली आहे. यावेळी ते म्हणाले अतिवृष्टीने शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकार मात्र, मश्गुल आहे. सगळी व्यवस्था शेतकऱ्यांविरोधात आहे. निसर्गाने थैमान घातले असतांना राज्यकर्ते आणखी नुकसान करत आहेत.

हे देखील पहा-

परदेशी सोयाबीन खरेदी केली म्हणून दर खाली आला आहे. त्याला सरकारचे धोरण जबाबदार आहे. सरकार ने एवढा विचार करावा. बाजारातून दर तरी मिळून द्यावा. शेतकऱ्यांसाठी काही मेहरबानी करण्यापेक्षा परदेशी सोयाबीन, पेंड आयात करायला नव्हती पाहिजे. यामध्ये अदानी अंबानी यांना फायदा झाला आहे. हे सर्व सरकारच्या आशीर्वादाने रचलले कट कारस्थान आहे. कृत्रिमरित्या केलेलं कारस्थान आहे. त्यामुळे लातूरला सोयाबिन परिषद घेऊन भांडाफोड करणार आहे. अस्मानी आणि सुलतानी असे दोन्ही संकट मराठवाडयातील शेतकऱ्यांसमोर आहे. राज्य सरकार मधील मंत्री बारशाला जातात.

मात्र, विदर्भ मराठवाडयात फिरकत नाहीत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला काही देणार नाही अशी अवस्था मुख्यमंत्री यांची झाली आहे. तिजोरीत पैसा नाही असे ते सांगत असतात. जर तिजोरीत पैसा नाहीत तर आम्ही दरोडे टाकावे का? असा सवाल देखील शेट्टी यांनी यावेळी केला आहे. सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनी दीड वर्ष बसून खलेत तरी महागाई भत्ता दिला जातो. शेतकऱ्यांना मदत केली असती, तर शेकडो शेतकरी वाचले असते. सरकारी अधिकाऱ्याचे लाड खूप झाले आहेत. विमा कंपन्यासोबत राहून हे अधिकारी लुबाडणूक करत आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारमधील मंत्र्यांना देखील कंपनीकडून हिस्सा जात असेल- राजू शेट्टी
Jammu Kashmir मध्ये चकमक; लष्करचे 5 जवान शहीद

विमा कंपनीला विमा भरलेला असतांना उंबरठा उत्पन्न कारण दाखवत विमा नाकारला. त्यात विमा कंपनी वाल्यांनी १० हजार कोटी कमावले. यामुळे असा संशय आहे की केंद्रीय मंत्री आणि राज्य मंत्र्यांना किती पैशे जातात. त्यांचा हिस्सा शोधावा लागेल. या विमा कंपनीच्या दरोड्याला कुणाचे पाठबळ? त्यामुळे आता हे थांबल नाही तर हजारो शेतकरी घेऊन विमा कंपनीचे कार्यालय फोडू. इथून पुढे आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा देखील शेट्टी यांनी दिला आहे. यावेळी रविकांत तुपकर म्हणाले, की आमदार खासदारांचा वाढदिवस साजरा करणाऱ्यांनो बापाचा वाढदिवस कधी केला का?

शेतकऱ्यांचे क्रांतीसिंह नाना पाटील राजू शेट्टी आहेत. पुढाऱ्याना घाबरू नका, ते बायकोला भीतात लफडी बाहेर काढेल म्हणून. पावसाने सगळे सोयाबीन गेले परिस्थिती पाहवत नाही. आता लढाई लढावी लागणार आहे. त्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका. जो शेतकऱ्यांना आढावा येईल, त्याला तुडवा त्याला आडवं करा. शेतकरीच नाही तर शेतकऱ्यांचे कुटुंब देखील उद्धवस्त होत आहेत. त्यामुळे आपल्या आईच कुंकू पुसायला उठलेल्या राजकारणी आणि अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांच्या पोरांनी भगतसिंग होऊन आता रस्त्यावर उतरावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी यावेळी केला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.