महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी

यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार या दोन्हींवर निशाना साधला.
महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी
महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टीSaamTvNews

सोलापूर: महाराष्ट्रात गुंडाप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये टोळीयुद्ध सुरू असून जनतेच्या मूलभूत प्रश्नाकडे दोन्ही सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली. तसेच दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढत आहेत. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बोलणे गरजेचे असताना ते भलत्याच कामात व्यस्त असल्याचे ठिकाण देखील यावेळी शेट्टी यांनी केली. सोलापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली थकीत ऊस बिल संदर्भात काँग्रेस भवन समोर मागील 12 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी राजू शेट्टी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार या दोन्हींवर निशाना साधला.

महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू- राजू शेट्टी
आमदार पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादीत हाणामारी; पडळकरांची गाडी फोडली

बिघडलेल्या नटांचे बिघडलेली पोरं गांजा ओढतात. यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण इथे महापुरात बुडालेला शेतकरी, अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेला शेतकरी, ऊस बिल न मिळाल्याने आंदोलन करणारा शेतकरी यांच्याकडे लक्ष द्यायला सरकारकडे सध्या लक्ष नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. इथे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये राजकीय टोळीयुद्ध सुरू आहे. गुंडांच्या टोळ्यप्रमाणे एकमेकांना बघून घेण्याची भाषा केली जात असल्याची टीका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

दरम्यान ऐन दिवाळीच्या काळात रस्त्यावर येत बेवारशासारखं शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र पोलीस त्यांच्यावर कारवाई करतात हीच शरमेची गोष्ट आहे. वास्तविक 14 दिवसात ऊस बिले आधार करणे बंधनकारक आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे आहे. सरकार शेतकऱ्यांना संरक्षण द्यायला कमी पडत आहे. शरमेची गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. दरम्यान ऊस बिल मागण्यांसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे भडकले होते. रागाच्या भरात त्यांनी एका शेतकऱ्याला शिवी देखील हासडली. यावरून देखील शेट्टी यांनी म्हेत्रे यांच्यावर टीकास्त्र साधलं. ''आपल्या घामाचा मोबदला मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना शिव्या दिल्या जातात. शिव्या घ्यायच्या झाल्या तर त्यांच्यापेक्षा जास्त घाण शिव्या आम्हाला येतात. मात्र ती आमची संस्कृती नाही. यावरून अक्कलकोटची संस्कृती कुठल्या थराला गेली आहे याचा अंदाज येईल." अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com