
Pandharpur News : गाईच्या दूधाला 40 रूपये व म्हशीच्या दूधाला प्रती लिटर 70 रूपये भाव मिळावा या मागणीसाठी आज (साेमवार) पंढरपूर - विजयपूर या राष्ट्रीय महामार्गावर (pandharpur vijapur national highway) रयत क्रांती संघटनेच्या (rayat kranti sanghatana) यांच्यावतीने अनवली चौकात रास्ता रोको आंदोलन (rasta roko aandolan) केले. (Maharashtra News)
गाईच्या दूधाला प्रती लिटर 40 रूपये भाव मिळावा, दूधाची राज्य सरकारने हमीभावाने खरेदी करावी, सहकारी व खासगी दूध संस्थांचे लेखा परीक्षण करावे या मागण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष दीपक भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली दूध उत्पादन शेतकऱ्यांनी आजचे आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.
दूधामध्ये होणारी भेसळ रोखावी अन्यथा सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्री. भोसले यांनी दिला आहे. ऐन उन्हाळ्यात दूधाचे भाव पडल्याने दूध उत्पादक शेतक-यांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.