Loss Of Chilli : अवकाळीचा झटका... नंदूरबारच्या मिरची व्यापाऱ्यांना 50 लाखांचा फटका; सरकारच्या निर्णयाकडं लक्ष

सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा शेतक-यांसह व्यापा-यांची आहे.
red chillies, nandurbar
red chillies, nandurbarsaam tv

- सागर निकवाडे

Nandurbar : नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरची पीक घेतले जाते. इतर राज्यात मिरची निर्यात केली जाते परंतु अवकाळी पाऊस पडल्यामुळे याचा फटका मिरची पिकाला देखील बसला आहे. (Maharashtra News)

व्यापा-यांनी शेतकऱ्यांकडून मिरची विकत घेऊन सुकवण्यासाठी पथारीवर टाकली होती. परंतु अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे (rain) व्यापारी वर्गाची एकच तारांबळ उडाली. पथारीवर सुकवण्यासाठी टाकण्यात आलेली मिरची पावसामुळे खराब झाली.

red chillies, nandurbar
Kalamb Beach : नालासोपाऱ्यातील युवकाचा समुद्रात बुडून मृत्यू

शेतकऱ्यांसोबतच (farmers) आता व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास 40 ते 50 लाखांचे नुकसान व्यापाऱ्यांचे झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शासनाने पंचनामे करून व्यापाऱ्यांना देखील मदत करावी अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे. आता सरकार नेमका काेणता निर्णय घेणार याकडे मिरची उत्पादक शेतकरी आणि व्यापा-यांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com