Red Chilly Price: रोजच्या जेवणाला महागाईची फोडणी! लाल मिरचीला सोन्याचा भाव

लाल मिरचीला सोन्याचा भाव आलाय, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण लाल भडक मिरची आता तिच्या दरामुळे सोन्यासारखी चमकतेय.
red chilli
red chilliSaam tv

औरंगाबाद - दिवाळीनंतर ऊन वाढायला सुरू झालं की बाजारात मिरचीची आवक वाढते आणि घरोघरी वर्षभराच्या मिरचीची तयारी सुरू होते. पण यंदा मिरचीचा भाव झणझणीत तिखट झाल्याने वर्षभराच्या मिरचीसाठी जरा विचारच करावं लागणार आहे. लाल मिरचीचा (Red Chilly) झणझणीतपणा आता अजूनच वाढला आहे. (Red Chilly Price Hike)

मिरचीचे भाव दुप्पट झाले आहेत. त्यामुळे लाल मिरचीला सोन्याचा भाव आलाय, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. लाल मिरची बाजारात थेट २६ हजार ते एक लाख रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पहिल्यांदाच लाल मिरची एवढी तेजतर्रार झाली आहे.

का महागली मिरची?

- नवीन मिरचीचा हंगाम मार्च ते मे हे तीन महिने असतो. मागील हंगामात मिरची उत्पादक महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक (Karnataka) या राज्यांना अतिपावसाचा फटका बसला होता.

- अति पाऊस झाल्यानं ६० ते ७० टक्क्यांनी लाल मिरचीचे उत्पादन कमी झाले होते.

- कर्नाटकातील ब्याडगी नावाचे गाव आहे. तेथून ब्याडगी लाल मिरची बाजारात येते. आजघडीला ही मिरची ४७ हजार ते ५१ हजार रुपये प्रति क्विंटल दराने विकली जात आहे. दोन महिन्यांपूर्वी याच मिरचीचे भाव ३० हजार ते ३५ हजार रुपये होते.

- तिखट, झणझणीत पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीला जास्त मागणी असते. १८ हजार ते २० हजार रुपये क्विटलने विकणारी ही मिरची सध्या ३१ हजार रुपये ते ३२ हजार रुपये क्विटल दराने मिळत आहे.

- खान्देशातून येणारी रसगुल्ला मिरची चक्क ९५ हजार रुपये ते एक लाख रुपये क्विटल भावाने विकली जात आहे. ही मिरची एकदम लालभडक असते; पण तिखटपणा कमी असतो. यामुळे तिला रसगुल्ला लाल मिरची म्हणतात. मागील हंगामात ४५ हजार रुपयांपर्यंत क्चिटलला भाव मिळाला होता. महाग असल्याने व्यापाऱ्यांनी ही मिरची खरेदी करणे बंद केले आहे.

सध्या बाजारात लाल मिरचीची आवक कमी होत आहे. नवीन मिरची यायला आणखी वेळ लागेल. मिरची पावडर बनविणाऱ्या कंपन्यांकडून मागणी वाढल्याने भाव कडाडले आहेत. त्यामुळे मिरची तिच्या रंगाप्रमाणे भावात पण लालेलाल झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com