पपईच्या पिकावर लिपकर रोगाचा धोका, फळबाग शेतकरी संकटात

औसा तालुक्यातील शेतकरी आता फळबाग पिकातून आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वीकारत असताना आता पपई पिकावर लिपकर रोगाचा मोठा धोका झाला आहे.
पपईच्या पिकावर लिपकर रोगाचा धोका, फळबाग शेतकरी संकटात
पपईच्या पिकावर लिपकर रोगाचा धोका, फळबाग शेतकरी संकटातदीपक क्षीरसागर

लातूर - जिल्ह्यातील औसा तालुक्यातील शेतकरी Farmer आता फळबाग पिकातून आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वीकारत असताना आता पपई पिकावर लिपकर रोगाचा मोठा धोका झाला आहे. यावर कृषी खात्याने तात्काळ मार्गदर्शन करत पपई Papaya या पिकाला राष्ट्रीय फळबाग योजनेत समाविष्ट करून विमा सरंक्षण दद्यावी अशी मागणी उटी येथील शेतकरी रामकृष्ण जाधव यांनी केली आहे.

लातूर तसा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भाग. सतत निसर्गाची अवकृपा असते कधी मुबलक पाऊस तर कधी कोरडा दुष्काळ याच चक्रव्यूहात शेतकरी अडकलेला असतो औसा तालुक्यातील उटी गावाचे प्रगतशील शेतकरी रामकृष्ण जाधव यांना १८ एकर शेती असून यात ऊस, सोयाबीन, उडीद, मूग , ज्वारी आदी पिकांसह भाजीपाला व फळपिकांची लागवड करत आहेत.

हे देखील पहा -

चालू वर्षी त्यांनी ४ एकर तैवान ७८६ रेड लेडी या वाणाच्या पपईची लागवड केली आहे यासाठी त्यांनी जमिनीची मशागत, खते,  लागवड, रोप यासाठी २ लाख १८ हजार रुपयांचा खर्च केला दरम्यान पिकाच्या संगोपनासाठी दीड लाखांचा खर्च केला आता याच पपईवर लिपकर रोगाचा धोका निर्माण झाला आहे.

पपईच्या पिकावर लिपकर रोगाचा धोका, फळबाग शेतकरी संकटात
... तर या गोष्टीला मी स्वतः विरोध करणार- शिवेंद्रराजे यांचा इशारा

यावर औषधीचा खर्च करून देखील यावर नियंत्रण मिळाले नाही आता पपई या फळपिकाला राष्ट्रीय फळबाग योजनेत समाविष्ट करावा अशी मागणी रामकृष्ण जाधव या शेतकऱ्याने केली आहे. अश्या रोगाचा धोका झाल्यास या पपई पिकाला विमा भरता येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात अडकत आहे. यास केंद्र सरकारने फळांना विमा संरक्षण दिले तर फळबाग शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे अशी आशा रामकृष्ण जाधव या शेतकऱ्यांन व्यक्त केली आहे.

Edited By - Shivani Tichkule

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com