मावळातील बैलांच्या रॅम्प वॉक स्पर्धेत 'रुस्तम'ने पटकावला प्रथम क्रमांक

बैलांची निवड ही त्याची चाल, शिंग, देखणेपणा, रुबाबदारपणा, वशिंड या निकषांवर केली जाणार होती. त्यानुसार रुस्तम या सगळ्या निकषांमध्ये अव्वल ठरला. आणि विजेते पदाचा मान मिळवला.
Maval News
Maval Newsदिलीप कांबळे

मावळ - आत्तापर्यंत आपण महिला, मुली, पुरुष यांचे रॅम्प वॉक झालेले बघितले आहे. परंतु मावळात प्रथमच आता एका बैलगाडा (Bullock Cart) प्रेमी ने चक्क बैलांच्या रॅम्प वॉकची स्पर्धा भरवली होती. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने असली तरी याचा बक्षीस वितरण समारंभ मात्र ऑफलाईन पध्दतीने घेतला गेला. मावळातील (Maval) कान्हे गावातील दिनकर सातकर यांच्या रुस्तम याने ही स्पर्धा जिंकण्याचा मान मिळवला आहे. बैलांची निवड ही त्याची चाल, शिंग, देखणेपणा, रुबाबदारपणा, वशिंड या निकषांवर केली जाणार होती. त्यानुसार रुस्तम या सगळ्या निकषांमध्ये अव्वल ठरला. आणि विजेते पदाचा मान मिळवला. (Maval Latest News)

हे देखील पहा -

शेतकरी व बैलगाडा प्रेमींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्याने बैलगाडा प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असताना, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा एकदा बैलगाडा शर्याती स्थगित करण्यात आली. आणि सर्वांचाच भ्रमनिरास झाला. मात्र या नंतर पुन्हा एकदा बैलगाडा चाहत्यांच्या व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी मावळ मधील बैलगाडा प्रेमी संतोष जांभुळकर यांनी ही स्पर्धा भरवली. मावळ तालुक्यात बैलगाडा प्रेमी हे मोठ्या प्रमाणात आहेत. त्यासाठी मावळ मधील संतोष जांभूळकर यांनी थेट बैलांची रॅम्प वॉक स्पर्धाच आयोजित केली होती. बैलगाडा प्रेमीनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.

या स्पर्धेत बैलजोडी चा किंवा एका बैलाचा चालताना चा एक मिनिटांचा विडिओ संपूर्ण कुटुंबासह काढायचा होता. त्यानंतर बैलांचा गोठा कशा पद्धतीने बनवला आहे. त्यात बैलांच्या राहण्याची, खाण्याची, पिण्याची कशी सोय करण्यात आली आहे हे देखील या व्हिडिओ द्वारे दाखवायचे होते. या स्पर्धेत शेकडो बैलगाडा प्रेमींनी सहभाग घेतला होता.

Maval News
भाजप पदाधिकाऱ्याच्या गाडीने अचानक घेतला पेट; चालकाच्या प्रसंगावधानाने टळली जीवित हानी!

जी बैलजोडी अथवा बैलांची सजावट आकर्षक असेल अशा बैलांना किंवा बैलजोडीला विजेता घोषित करण्यात येणार होते. यासाठी स्पर्धेत स्वतःचा बैल असणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे बैल हा सजवलेला, स्वच्छ असणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार होते. मात्र स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वच बैलांमध्ये दिनकर सातकर यांचा रुस्तमने प्रथम क्रमांक पटकावला. रुस्तम हा देखणा, रुबाबदार, मोठी शिंग, मोठे वशिंड असलेला असल्याने त्याला हा प्रथम क्रमांक देण्यात आला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर साम टीव्हीला फॉलो करा. त्याच सोबत यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com