Sangli: बाप रे! एकट्याने तोडला एक-दोन नव्हे तर 16 टन ऊस; ऊसतोड मजुराचा विक्रम...

ईश्वर सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात 20 गुंठ्यातील16 टन ऊस तोडून विक्रम केला आहे. याबद्दल वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार देखील केला.
Sangli: बाप रे! एकट्याने तोडला एक-दोन नव्हे तर 16 टन ऊस; ऊसतोड मजुराचा विक्रम...
Sangli Agriculture Newsविजय पाटील

सांगली - जिल्ह्यात वारणा साखर कारखान्याच्या (Sugar factory) चालू गळीत हंगाम सुरू आहे. या हंगामासाठी कुंडलवाडी येथील संजय फाटक यांनी ऊसपुरवठा करण्यासाठी ट्रॅक्टरचा (Tractor) करार केला आहे. या ट्रॅक्टरवर जत तालुक्यातील खैराव येथील ऊसतोड मजुरांची टोळी आली आहे. याच टोळीतील ईश्वर सांगोलकर यांचे वय 50 आहे. सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात एका दिवसात 20 गुंठ्यातील16 टन ऊस (Sugarcane) तोडून विक्रम केला आहे. याबद्दल वारणा साखर कारखाना प्रशासनाने त्यांचा सत्कार देखील केला. (Latest Agriculture News)

हे देखील पहा -

जत तालुक्यातील खैराव गावातील एका सर्वसामान्य कुटुंबातील ईश्वर सांगोलकर हा गेल्या पंचवीस वर्षांपासून वारणा साखर कारखाना आणि इतरही साखर कारखान्यात ऊसतोड मजूर म्हणून काम करत आहे. ईश्वर यांनी वाळवा तालुक्यासह अनेक तालुक्यात ऊसतोडीचे कामे केली आहेत. मागील पंधरा दिवसांपासून कुंडलवाडी येथे ऊसतोड सुरु आहे. सागर सावंत यांच्या शेतात ऊसतोड सुरु असताना ईश्वर सांगोलकर यांनी एकट्याने दिवसाकाठी 16 टन ऊसतोड करून एक नवा विक्रम केला आहे.

हा ऊस संजय फाटक यांच्या ट्रॅक्टर वाहनातून वारणा कारखान्याला पाठवण्यात आला आणि त्याची पावती पाहून सर्वजण अवाक झाले. कारण एका दिवसात ईश्वर सांगोलकर यांनी 16 टन ऊस तोडला होता. या टोळीमध्ये 10 कोयते म्हणजे 10 पुरुष आणि 9 महिला असे काम करतात. तसे पाहिले तर एक ऊसतोड मजूर हा एका दिवसापोटी फक्त दोन टन ऊस तोडत असतो.

Sangli Agriculture News
सांगली महापालिकेच्या घंटा गाडीला लटकून आजीच्या लिफ्टचा थरारक प्रवास...

मात्र एका दिवसात ईश्वर सांगोलकर यांनी 16 टन ऊस तोडण्याची किमया केली आहे. ईश्वर सांगोलकर यांनी अशोक सावंत यांच्या शेतात हा ऊस तोडणीचा विक्रम केला आहे. दिवसभरात केवळ दोन बिस्किट पुडे आणि ताक पिऊन त्यांनी 20 गुंठ्यातील 16 टन ऊस तोडला.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com