सेलु बाजार समिती शेतकऱ्याच्या मदतीला; शेतमाल तारण कर्ज योजना सुरू

शेतमाल तारण योजना अंतर्गत कर्जसाठी मूग, बेदाना, सोयाबीन, गहू, उडीद,चना बाजरी,काजू बी आणि हळद इत्यादी शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे.
सेलु बाजार समिती शेतकऱ्याच्या मदतीला; शेतमाल तारण कर्ज योजना सुरू
सेलु बाजार समिती शेतकऱ्याच्या मदतीला; शेतमाल तारण कर्ज योजना सुरूराजेश काटकर

परभणी - शेतकऱ्यांना असलेल्या आर्थिक गरजेपोटी तसेच त्यातून निघालेला शेतमाल साठवणुकीसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात. त्यामुळे बरेच शेतकरी शतीमाल बाजारात आणतात आणि बाजारात अचानक आवक वाढल्याने शेतमालाचे भाव गडगडतात. परंतु या योजने अंतर्गत शेतात पिकवलेला शेतमाल काही काळ साठवून काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्याला चांगला भाव मिळतो. या दृष्टिकोनातून शेतकर्‍यांना शेतमालासाठी चांगला भाव आणि पर्यायाने त्यांना नफा मिळावा या एका दृष्टिकोनातून शेतकरी तारण कर्ज योजना सेलु बाजार समिती कडून राबविण्यात येत आहे.

हे देखील पहा -

शेतमाल तारण योजना अंतर्गत कर्जसाठी मूग, बेदाना, सोयाबीन, गहू, उडीद,चना बाजरी,काजू बी आणि हळद इत्यादी शेतमालाचा समावेश करण्यात आलेला आहे. योजना बाजार समिती मार्फत राबविली जात आहे. शेतमाल तारण ठेवून मिळणाऱ्या कर्जाची परतफेड सहा महिन्याच्या आत करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याजदर सवलत देण्यात येते.

सेलु बाजार समिती शेतकऱ्याच्या मदतीला; शेतमाल तारण कर्ज योजना सुरू
निवडणुकीला फटका बसणार म्हणून मोदींनी हे कायदे रद्द केले – शरद पवार

सध्या सोयाबीनचे भाव कमी जास्त होत आहेत शेतकऱ्याना म्हणावा तसा भाव भेटत नाही व ह्या योजने मुळे आपले सोयाबीन तारण ठेऊन त्यावर पैसे मिळत असल्याने शेतकऱ्याना दिलासा मिळाला आहे.ह्या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून रब्बी पेरणीसाठी हे पैसे कमी येणार आहेत.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com