देऊळगावत रोपवाटिका मजूरांचा सात महिन्याचा पगार थकला

मोहाडी तालुक्यातील कान्द्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव येथे रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत अनेक मजूर कामावर होते.
देऊळगावत रोपवाटिका मजूरांचा सात महिन्याचा पगार थकला
देऊळगावत रोपवाटिका मजूरांचा सात महिन्याचा पगार थकलाअभिजीत घोरमारे

भंडारा जिल्ह्याच्या कांद्री वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव रोपवाटिका येथे कामावर असलेल्या पाच मजुरांचा अद्याप पगार मिळालेला नसल्याने त्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली असून पगार मिळवण्यासाठी मजूरांचा कार्यालयात खेटा सुरु आहे.

मोहाडी तालुक्यातील कान्द्री वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव येथे रोपवाटिका आहे. या रोपवाटिकेत अनेक मजूर कामावर होते. त्यांना झाडांना पाणी देणे कटिंग करणे व त्याची देखभाल दुरूस्ती करणे, शासकीय निवासस्थाची कामे कपडे धुणे, भांडे धुणे, झाडू लावणे इतर कामाकरिता पाच मजुरांना कामावर ठेवले होते.

देऊळगावत रोपवाटिका मजूरांचा सात महिन्याचा पगार थकला
12 आमदारांच्या निलबंनाबद्दल शरद पवार म्हणाले...चुकीचं वागणाऱ्यांना शिक्षा होणारच!

मात्र मागील सात महिन्यापासून पगार झाला नसल्याने या मजुरांनी थकित पगारासाठी सतत खेटा घातल्या मात्र अधिकाऱ्यांद्वारे अद्याप पगार काढला नसल्याने जगावं कसं असा प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच कोरोणामुळे हाताला काम नाही त्यामुळे रोपवाटिका वर जाऊन आपल्या दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था होईल त्या आशेने हे मजूर कामावर गेले, मात्र मजुरांच्या पगार न मिळाल्याने त्यांच्या वर उपासमारीचि वेळ आली आहे.

या मजुरांनी उपवनसंरक्षका सह आजी-माजी आमदारांना विनवनी केली असून झालेल्या तक्रारीही चौकशी करण्याचे आदेश ही उपवनसंरक्षकाद्वारे देण्यात आले आहे. त्यामुळे ह्या मजूरांचा पगाराबाबात काय निर्णय होतात हे पाहणे महत्वाचे ठरेल.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com