Rasta Roko Aandolan : शेतकरी कामगार पक्षाने राेखला माजलगाव - पाथरी राष्ट्रीय महामार्ग; वाहनांची तीन किलाेमीटर रांग

शेतीमाला किफायतशीर हमी भाव देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे.
Beed, Shetkari Kamgar Paksh, Rasta Roko Andolan
Beed, Shetkari Kamgar Paksh, Rasta Roko Andolansaam tv

Beed News : शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी बीड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या (shetkari kamgar paksha) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता राेकाे आंदाेलन (rasta roko aandolan) छेडले आहे. (Breaking Marathi News)

Beed, Shetkari Kamgar Paksh, Rasta Roko Andolan
Cancelled Trains List : महाराष्ट्र एक्सप्रेससह १२ गाड्या रद्द; जाणून घ्या कारण

शेतमालाला हमीभाव द्या, शेतकऱ्याला 10 हजार रुपये महिना पेन्शन द्या या व अन्य मागण्यांसाठी बीड येथील शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आज कार्यकर्त्यांनी माजलगाव - पाथरी रोडवर मोठेवाडी येथे तब्बल दीड तास रास्ता रोको करत शासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला.

Beed, Shetkari Kamgar Paksh, Rasta Roko Andolan
Naresh Mhaske Statement : पवार कुटुंब समजायला... गद्दारीच्या टीकेवर काका पुतण्यांसह सुळेंचे उत्तर (पाहा व्हिडिओ)

यावेळी रास्ता राेकाे आंदाेलनामुळे महामार्गावर दोन ते तीन किलो मिटर अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शासनाने शेतकऱ्यांचा बी- बियाणे, खते, औषधे, रोजंदारी, डिझेल, पेट्रोल, व यंत्रसामग्री यांच्या किंमतीत प्रचंड भाववाढ केली आहे. त्यामुळे वास्तव खर्चावर आधारित शेतकऱ्यांच्या शेतीमाला किफायतशीर हमी भाव देण्याची मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com